घरमुंबईवापरलेला कंडोम घातला सापाच्या तोंडावरच, वेळीच सुटकेमुळे वाचला जीव

वापरलेला कंडोम घातला सापाच्या तोंडावरच, वेळीच सुटकेमुळे वाचला जीव

Subscribe

मुंबईत एका सापाच्या निमित्ताने माणसांमधील आणखी एक विकृती समोर आली आहे. माणुसकीला  घटना कांदिवली येथे काही दिवसांपूर्वी घडली आहे. एका विकृताने वापरलेला कंडोम सापाच्या तोंडावर लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तोंडावरच कंडोम लावल्याने सापाची अवस्था काही काळासाठी अतिशय नाजुक झाल्याचे या घटनेतून समोर आले आहे. कांदिवलीच्या ग्रीन मिडोव्ज हाऊसिंग सोसायटीच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. सापासोबत झालेला हा प्रकार पाहून तत्काळ सर्पमित्राची मदत घेण्यात आली.

snake rescue

- Advertisement -

सापाच्या तोंडावरच प्लॅस्टिकसारख्या वापर केल्याने साप विचित्र पद्धतीने वावरत असल्याची तक्रार कांदिवली पूर्वेला राहणाऱ्या वैशाली तन्हा यांनी सर्पमित्राला दिली. त्यानंतर मिता मालवणकर या सर्पमित्राने त्याठिकाणी पोहचून प्रत्यक्ष पाहिले तर ते प्लॅस्टिक नसून कंडोम असल्याचे निदर्शनास आले. दिवड (Checkered Keelback) जातीचा या पाणसापाच्या तोंडावरच कंडोमचा वापर केल्याने सापाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचे सर्पमित्राच्या लक्षात आले. ज्या व्यक्तीने असा प्रकार केला असेल त्याला सापांविषयीची नक्कीच माहिती असेल असा दावा सर्पमित्राने केला आहे.

snake rescue

- Advertisement -

सापाला आपल्या तीक्ष्ण दातांचाही वापर या कंडोमच्या आवरणावर करणे शक्य झाले नसल्याचे निरीक्षणही तिने नोंदवले. या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कंडोमच्या तावडीतून सुटका करून या सापाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडून देण्यात आले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सापाला या सगळ्या प्रकारात त्रास झाला असल्याचे स्पष्ट केले. पण साप आता बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. सापाला कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत. सापाची रिकव्हरी पाहूनच त्याला जंगलात सोडून देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

used condom

पाणसाप दिवड

भारतात अगदी सर्वत्र आणि सहज दिसणाऱ्या सापांपैकी हा एक साप. गोड्या पाण्यात रहाणारा हा साप नद्या, तलाव आणि मोठ्या पाणथळीच्या जागी दिसतो. पाउस पडायला सुरवात झाली आणि सगळीकडे पाणी भरायला लागले की हे साप आपल्याला सहज दिसतात. साधारणपणे २ ते ५ फूट वाढणारा हा साप काळसर, हिरवट, पिवळसर रंगाचा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही नक्षी काहीशी बुद्धीबळाच्या पटासारखी दिसते म्हणूनच याचे इंग्रजी नाव “checkered keelback”. याचे डोळे बटबटीत आणि बुबुळे गोलाकार असतात. डोळ्यामागे एक तिरकी काळी रेघ असते. हा साप दिवसा आणि रात्रीसुद्धा कार्यरत असतो. याच्या खाण्यामधे प्रामुख्याने मासे, बेडूक, पाण्यातले किटक असतात. हा साप लहान असताना माश्यांची पिल्ले किंबा बेडकाची पाण्यातली लहान पिल्ले खाउन वाढतो. याचा स्वभाव प्रचंड तापट असतो आणि तो दंश करण्यात पटाईत आहे. याचा दंशसुद्धा जोरदार आणि वेदनादायक असतो. पण हा साप पुर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्या चाव्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -