घरमनोरंजनसिनेसृष्टी झाली अनलॉक, गोरेगाव फिल्मसिटीमध्ये शूटिंगला दिली परवानगी

सिनेसृष्टी झाली अनलॉक, गोरेगाव फिल्मसिटीमध्ये शूटिंगला दिली परवानगी

Subscribe

गेल्या दोन राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीतील शूटिंग थांबवण्यात आले होते. त्यामुळे अनेक मालिकांचे शुटिंग हे मुंबईबाहेरील गोवा आणि इतर राज्यांमध्ये सुरु होते. मात्र महाराष्ट्रात आता अनलॉकची घोषणा झाल्याबरोबर सिनेसृष्टी देखील अनलॉक झाली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेली गोरेगाव फिल्मसिटी शुटिंगच्या गडबडीने पुन्हा गजबजणार आहे. येत्या १५ जूनपासून गोरेगाव फिल्मसिटीमध्ये चित्रीकरण करण्याची परवागणी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे. त्यामुळे मालिकांच्या सेटवर देखील येत्या महिन्याखेरपर्यंत शुटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर काही दिवसांतच गोरेगाव फिल्मसिटीत सर्व चित्रिकरणाचे प्रयोग सुरु होतील. परंतु या चित्रिकरणादरम्यान कोरोनासंबंधित सर्व नियम, मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे लागणार आहे. तसेच चित्रिकरणादरम्यान मार्गदर्शक सुचनांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी महामंडळाने काही अधिकारी नेमले आहे. या अधिकाऱ्यांमार्फत सेटची तपासणी केली जाणार आहे.

 शुटिंगला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी 

सध्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये ‘स्वराज्यजननी जिजामाता’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘बायको अशी हव्वी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ अशा अनेक मराठी मालिकांचे सेटसह अनेक हिंदी मालिका, रियॅलिटी शोचे आणि चित्रपटांचे सेटदेखील तयार आहेत. मात्र मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने या सेटवर शुटिंग करण्यास राज्य सरकारने बंदी घातली. परंतु दोन महिन्यांनंतर मुंबईत कोरोनास्थिती नियंत्रणात येत असून मुंबई सध्या ‘लेव्हल ३’मध्ये आहे. त्यामुळे
मालिका आणि चित्रपटांना याठिकाणी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच चित्रीकरणास परवाानगी दिली आहे. परंतु अनेक निर्मात्यांनी वेळेची मर्यादा वाढवून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर येत्या दिवसांत निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

६५ हून अधिक वयोगटातील कलाकारांना प्रवेश बंदी 

मात्र फिल्मसिटीमध्ये मालिका आणि सिनेमांचे शुटिंगसंदर्भातील नियमावलीनुसार, जेष्ठ कलाकार अर्थात ६५ हून अधिक वयोगटातील कलाकार, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील व्यक्तींना चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाहीय. तसेच सेटवर मर्यादित व्यक्तींपेक्षा अधिकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. फिल्मसिटीत प्रवेश करतेवेळी निर्मिती संस्थेचे अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगणं आवश्यक कलाकाराला आवश्यक आहे. तसेच फिल्मसिटी व्यवस्थापन आणि निर्मिती संस्थेत समन्वयकाची नेमणूक निर्मात्याला करावी लागेल. सर्व कलाकारांपासून ते स्पॉटबॉयपर्यंत सर्वांना आरोग्य सेतू अॅपचा वापर करणे सक्तीचे आहे. *चित्रीकरणासाठी प्रेक्षकांना प्रवेश नसणार आहे. चित्रीकरणात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं आपली वैद्यकीय माहिती स्वघोषित करणं आवश्यक आहे. वैद्यकीय वाहन आणि प्रथमोपचार सोयी सेटवर असणं आवश्यक आहे. तर केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्या व्यक्तीनं पीपीई कीटचा वापर करणे बंधनकारक आहे.


पर्यटकांनो थांबा! कर्जत, खालापूरमधील धबधबे, धरण, तलाव परिसरात जाण्यास बंदी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -