घरमुंबईमेट्रोच्या वेगवान बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा - मुख्यमंत्री

मेट्रोच्या वेगवान बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मुख्यमंत्री

Subscribe

मेट्रो ३ प्रकल्पाच्या वेगवान बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मेट्रो ३ प्रकल्पामुळे काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन योजनेवर तयार केलेल्या माहिती पुस्तिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. काळबादेवी-गिरगाव प्रकल्पबाधितांसाठी राबविण्यात येत असलेल्या पुनर्वसन आणि पुनर्विकास योजनेची इत्यंभूत माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काळबादेवी गिरगावसाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशने तयार केलेल्या पुनर्विकास योजनेचे कौतुक केले असून वेगवान बांधकामासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे देखील यावेळी सुचविले आहे.

प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन होणार

मुंबई मेट्रो ३ मार्गिकेतील गिरगाव आणि काळबादेवी ही भूमिगत मेट्रो स्थानके अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणी आहेत. ही स्थानके जरी पूर्णतः भूमिगत असली तरी स्थानकाचे प्रवेशद्वार, निवासस्थान आणि इतर सहाय्यक इमारती या जमिनीवर असणार आहेत. त्यासाठी तात्पुरत्या तसेच कायमस्वरूपी भूसंपादनाची आवश्यकता होती. यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे विकास नियंत्रण अधिनियम (३३/७) बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत काळबादेवी-गिरगाव प्रकल्पबाधितांसाठी पुनर्वसन योजना आराखडा तयार केला असून त्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे. या योजने अंतर्गत काळबादेवी-गिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबाचे ते राहत असलेल्या ठिकाणीच पुनर्वसन होणार आहे. ज्यामध्ये ३०० चौ.फुट पर्यंतच्या घरांच्या बदल्यात दुप्पट आकाराची घरे तर ३०० ते ४४४.४४ चौ.फुट घरांच्या बदल्यात ६०० चौ.फुट क्षेत्राची घरे तसेच ४४४.४४ चौ.फुट पेक्षा जास्त क्षेत्राच्या घरांच्या बदल्यात ३५% अधिक क्षेत्राची प्रकल्पबाधित कुटुंबाना देण्यात येणार आहेत. तसेच व्यावसायिक प्रकल्पबाधिताना २०% अधिक क्षेत्रफळाची जागा मिळणार आहे.

- Advertisement -

७१२ कुटुंब मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित होणार

काळबादेवी आणि गिरगाव या विभागात काळबादेवीसाठी के-१, के-२, आणि के-३ तर गिरगाव विभागासाठी जी-१, जी-२ आणि जी-३ अशा ६ विलग असणाऱ्या भूखंडांचा एकत्रित विचार करून त्यावरील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन के-२, के-३ आणि जी-३ या ब्लॉक्समध्ये करण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये के-२, के-३ व जी-३ येथे अनुक्रमे काळबादेवी व्यावसायिक केंद्र, काळबादेवी हाईट्स, गिरगाव हाईट्स या नावाने पुनर्विकास योजना राबविण्याचे प्रस्तावित केले आहे. विशेष म्हणजे गिरगाव आणि काळबादेवी मेट्रो स्थानकांची बांधणी याच इमारतीखाली होणार आहे. प्रकल्पबाधित इमारती पाडण्याचे काम सुरू झाले आहे. काळबादेवी-गिरगाव येथील २० जागांवरील ३० इमारतीतील एकूण ७१२ कुटुंब मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. त्यापैकी ६५७ प्रकल्पबाधितांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेंशी पर्यायी निवासासाठी करार केले आहेत आणि त्यापैकी ६०५ कुटुंबाना तात्पुरती घरे अथवा घरभाडे देण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांच्या तात्पुरत्या विस्थापनाची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

मुंबई मेट्रो ३ प्रकल्पामध्ये गिरगाव आणि काळबादेवी ही सर्वात महत्त्वाची मेट्रो स्थानके आहेत. काळबादेवी-गिरगाव येथील प्रकल्पबधितांचे पुनर्वसन ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने होत आहे. त्याविषयी आनंद वाटतो. त्याप्रमाणेच येथील रहिवाशांचे हा प्रकल्प समजून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे विशेष आभारी आहोत.  – अश्विनी भिडे, एमएमआरसीएल


वाचा – मेट्रो -३ प्रवासादरम्यान प्रवासी घेणार मोकळा श्वास

- Advertisement -

वाचा – मुंबई मेट्रो ३: पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचे भुयारीकरण ३१८ दिवसात पूर्ण 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -