विकी कौशल अन् कतरिना कैफचं वैदिक पद्धतीनंतर आता कोर्ट मॅरेज

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला आता 3 महिने झाले असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हे सत्य म्हणजे कतरिना आणि विकीने पुन्हा लग्न केलं आहे. ही धक्कादायक बातमी समजल्यावर चाहते हैराण झाले आहेत.

सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली जोडी म्हणजे विकी आणि कतरिनाची आहे. 9 डिसेंबर 2021 ला राजस्थानमध्ये कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये शाही थाटात या दोघांचं लग्न पार पडलं होते. यांच्या विवाहसोहळ्याची चर्चा आजही होत आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप वायरल झाले होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी पंजाबी पद्धतीने शाही थाटात राजस्थानमध्ये लग्न केले. यांचं लग्न हा एक चर्चेचा विषय ठरला होता. या दोघांच्या लग्नाचे फोटो प्रचंड वायरल झाले होते. सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करताना ते दोघे दिसले होते.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला आता 3 महिने झाले असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. हे सत्य म्हणजे कतरिना आणि विकीने पुन्हा लग्न केलं आहे. ही धक्कादायक बातमी समजल्यावर चाहते हैराण झाले आहेत. या दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असता त्यांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे रितीरिवाजांनी लग्न केलं होते. परंतु लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणजेच विकी आणि कतरिना विवाहित असून, त्यांचं लग्न कायदेशीर नव्हतं. तब्बल 3 महिन्यांनंतर विकी आणि कतरिना यांनी कायदेशीर पद्धतीने पुन्हा लग्न केलं. अगदी अलिकडेच यांनी त्यांचं लग्न रजिस्टर केले.

विकी आणि कतरिना हे 3 महिन्यांनंतर म्हणजेच 19 मार्चला कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा लग्नबंधनात अडकले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. परंतु आता कायदेशीर पद्धतीने लग्न केले. कतरिनाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना आणि विकी दोघेही कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ त्या दिवसाचा असल्याचे बोलले जाते आहे. विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर खूप कमी वेळ घालवला. हे दोघे शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवता येत नाही आहे.