घरमुंबईबविआची ‘शिट्टी’ बहुजन महापार्टीने ‘हिसकावली’

बविआची ‘शिट्टी’ बहुजन महापार्टीने ‘हिसकावली’

Subscribe

बविआची म्हणून वाजणारी ही ‘शिट्टी’ बहुजन महापार्टीसाठी वाजणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन महापार्टीने निवडणूक आयोगाकडे ‘शिट्टी’ निशाणीची मागणी केली होती. बहुजन महापार्टीची ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. त्यामुळे बविआची ‘शिट्टी’ आता बहुजन महापार्टीसाठी वाजणार अशी चर्चा वसईमध्ये सुरू आहे.

वसईमध्ये ‘शिट्टी’ आणि बविआ हे समीकरण! पण, आत्तापर्यंत बविआची म्हणून वाजणारी ही ‘शिट्टी’ बहुजन महापार्टीसाठी वाजणार आहे. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन महापार्टीने निवडणूक आयोगाकडे ‘शिट्टी’ निशाणीची मागणी केली होती. बहुजन महापार्टीची ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य देखील केली आहे. त्यामुळे बविआची ‘शिट्टी’ आता बहुजन महापार्टीसाठी वाजणार अशी चर्चा वसईमध्ये सुरू आहे. दरम्यान, एक खासदार, तीन आमदार, महापौर, शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींवरही सध्या बविआचा बोलबाला आहे. त्यामुळे ‘शिट्टी’ म्हणजे बविआ आणि बविआ म्हणजे ‘शिट्टी’ हे वसईतील समीकरण. पण, हे समीकरण आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेते गाफील कसे राहिले

लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू झाली आहे. पण, बविआसाठी वाजणारी ही ‘शिट्टी’ आता बहुजन महापार्टीसाठी वाजवणार आहे. बहुजन महापार्टीला ‘शिट्टी’ निशाणी मिळाल्यानं बविआचे कार्यकर्ते देखील अचंबित झाले आहेत. ‘शिट्टी’ या निशाणीवर बहुजन महापार्टी निवडणूक लढल्यास मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होणार आहे. तसेच बहुजन विकास आघाडीला आपली नवीन निशाणी मतदारांपुढे नेण्यास कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बहुजन महापार्टीने ‘शिट्टी’ हिसकावून घेईपर्यंत आपले नेते गाफील कसे राहिले? असा सवाल सध्या बविआच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. तर, ‘शिट्टी’ कायम ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून कोणती हालचाल केली जात आहे? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याप्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या एका मोठ्या नेत्याकडे विचारणा केली असता, ‘मला याबाबत काही माहिती नाही’ असे उत्तर देण्यात आले. तर अन्य नेत्यांनी यावर बोलणं टाळलं.

- Advertisement -

‘शिट्टी’मुळे विरोधक झाले होते हैराण

‘गोरे गोरे मुखडेपे काला काला चष्मा’ असा प्रचार करीत आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या तत्कालीन वसई विकास मंडळाने पुन्हा सत्ता काबीज केली होती. त्यांची ‘चष्मा’ ही निशाणी त्यावेळी खूप गाजली होती. त्यानंतर शिट्टी ही निशाणी घेऊन हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीने विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये धुमाकूळ घातला होता. त्यांची ‘शिट्टी’ ही निशाणी घरोघरी पोहोचली. कार्यकर्त्यांचे टी-शर्ट, टोप्या, मफलर आणि गाड्यांवर ‘शिट्टी’ निशाणी झळकू लागली. गल्लोगल्ली ‘शिट्टी’ वाजू लागल्यामुळे विरोधक हैराण झाले होते. त्यांना ‘शिट्टी’मुळे आपली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवणे अवघड झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -