मध्य वैतरणा भरण्याच्या मार्गावर ; धरणाच्या दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग

MUMBAI DAM

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातपैकी मोडकसागर , तानसा व तुळशी हे तीन धरणात अगोदरच भरून वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा धरणात भरण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रशासनाने या धरणाचे दोन गेट्स मंगळवारी दुपारच्या सुमारास किमान २० सेंमी अंतरावर उघडून पाण्याचा विसर्ग केला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणात क्षेत्रात सध्या चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळेच सात धरणाततील पाणी साठयात चांगलीच वाढ झाली आहे. सात धरणात मिळून १२,५४,३७७ दशलक्ष लिटर (८६.६७ टक्के) इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पुढील ३२५ दिवस पुरेल इतका म्हणजे ८ जून २०२३ पर्यन्त पुरेल इतका आहे.

सदर सात धरणांपैकी मोडक सागर धरणात १३ जुलै रोजी दुपारी १.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यानंतर तानसा धरणातही १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता भरून वाहू लागला. १६ जुलै रोजी सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास तुळशी धरणातही भरून वाहू लागला. आता मध्य वैतरणा धरणातही भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या मध्य वैतरणा धरणात १,८३,१३८ दशलक्ष लिटर ( ९४.६३ टक्के) इतका पाणीसाठा जमा आहे. धरणात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणात कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.

दरम्यान, सदर धरणात जवळजवळ भरण्याच्या मार्गावर असताना पालिकेने या धरणाचे दोन दरवाजे मंगळवारी दुपारच्या सुमारास २० सेंमी एवढ्या अंतराने उघडून त्यातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याचे समजते.