घरमुंबईजलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Subscribe

उल्हासनगर येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

उल्हासनगर येथील भरतनगर परिसरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम वेगाने सुरू असतांना जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले होते. यामुळे आधीच पाणीटंचाईने ग्रासलेल्या लोकांना दुष्काळात तेरावा महिना अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. अचानक फुटलेल्या जलवाहिनीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.

यामुळे फुटली जलवाहिनी

उल्हासनगर – ४ येथील सिमेंट काँक्रीटकरण रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्याठिकाणी होत आहे. याशिवाय जवळपास हजाराहून अधिक नागरीकांनी घेतलेल्या नळजोडण्या या रस्त्याच्या कामामुळे तुटल्या गेल्याने त्यातून देखील मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. सकाळ संध्याकाळ फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत असल्यामुळे भरतनगर परिसरात तलावाचे स्वरूप निर्माण झाले. याशिवाय फुटलेल्या जलवाहिनीतून माती आणि इतर सांडपाणी जात असल्यामुळे परिसरातील नागरीकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे त्या परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याचे खोदकाम करताना कोणतीही दक्षता घेतली जात नसल्यामुळे ती पाण्याची मुख्य जलवाहिनी फुटल्या गेल्याने होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष केले जात आहे. फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी थांबविण्यासाठी नागरीकांनी प्लास्टिक लावून पाण्याची गळती थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

आमच्यापर्यंत तक्रार आल्यानंतर आम्ही लगेच दुरुस्ती करतो, या रस्त्याचे काम एम एम डी ए मार्फत सुरू आहे. रस्त्याचे खोदकाम करतांना अनेकवेळा जलवाहिन्या तुटल्या जातात याची त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे.  – सी. जे. सोनावणे, मनपाचे पाणीपुरवठा अभियंता

रस्त्याच्या मधोमध काही जलवाहिन्या आहेत, काही वेळा या जलवाहिन्या तुटल्या जातात मात्र आम्ही त्वरीत दुरुस्ती करतो.  – एस के टिपू, एम.एम.आर.डी.ए.चे कंत्राटदार

- Advertisement -

हेही वाचा – जलवाहिनीलगत असणार्‍या झोपड्यांचा प्रश्न निकाली लागणार

हेही वाचा – जलवाहिनी फुटल्यामुळे परळमध्ये पाण्याची बोंब!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -