घरमुंबईऑनलाईन अर्जांचा श्रीगणेशा

ऑनलाईन अर्जांचा श्रीगणेशा

Subscribe

ही प्रक्रिया उशीराने सुरू झाल्याने गणेशोत्सव मंडळांना त्याचा फटका बसण्याची शक्यता समन्वय समितीतर्फे वर्तविण्यात आली असून ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने देखील परवाने द्यावेत, अशी मागणी शुक्रवारी समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागून राहिलेली ऑनलाईन परवाना प्रक्रिया अखेर शुक्रवारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या या ऑनलाईन प्रक्रियेनुसार गणेश मंडळांना तसेच नवरात्रोत्सव मंडळांना परवान्यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया उशीराने सुरू झाल्याने गणेशोत्सव मंडळांना त्याचा फटका बसण्याची शक्यता समन्वय समितीतर्फे वर्तविण्यात आली असून ऑनलाईनप्रमाणेच ऑफलाईन पध्दतीने देखील परवाने द्यावेत, अशी मागणी शुक्रवारी समन्वय समितीतर्फे करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याची घोषणा केली होती. गणेशोत्सव मंडळांसाठी ही सुविधा १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार होती. पण प्रत्यक्षात मात्र ४ दिवस उलटून देखील सुविधा सुरू न करण्यात आल्याचे समोर आले होते. यामुळे मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांना परवाना कसा घ्यावा, असा प्रश्न पडला होता. अखेर शुक्रवारी ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या एका बाजूला अनेक गणेशोत्सव मंडळांचे दिमाखदार पाद्य पूजन सोहळे पार पडत आहेत. तर दुसरीकडे येणार्‍या काळात गणेशोत्सव मंडळांना देखील मंडप व प्रवेशद्वार उभारणीकरिता तसेच मुंबई पोलिसांचे आणि वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. हे परवाने कसे मिळवावेतअसा प्रश्न मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांना पडला होता. मात्र उशिरा का होईना महानगरपालिकेकडून याकरिता ऑनलाइन पद्धतीने परवाने देण्यात येणार आहेत. याकरिता मंडळांना portal.mcgm.gov.in या वेबसाईटवर भेट देऊन परवाने घेता येणार आहेत.
याआधी गणेशोत्सव मंडळांना स्वतः जाऊन संबंधित कार्यालयांना अर्ज द्यावा लागायचा. मात्र, आता सर्व गोष्ट ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असल्याने खटाटोप कमी करण्यात आला आहे.

हा परवाना घेण्यासाठी मंडळांनी मात्र, आपली आधीची सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवणे आवश्यक आहेत. या सोबतच अर्जदाराने भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी, आधार क्रमांक इत्यादींसारख्या अनेक गोष्टी नोंदवाव्या लागतील.

- Advertisement -

अर्ज केल्यानंतर या संबंधित माहिती अर्जदाराला ई-मेल द्वारे दिली जाईल. या सोबतच या ई-मेल मध्ये दिलेल्या तपशिलानुसार अर्जदाराने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे या साठी आवश्यक अशी रक्कम जमा करायची आहे.

महानगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. मात्र यामध्ये काही अडचणी येऊ नयेत अशी आम्ही अपेक्षा करतो. – अमन दळवी, माजी प्रमुख कार्यवाहक, काळाचौकी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

महानगरपालिकेने घेतलेला हा खूप चांगला निर्णय आहे, यात काहीच वाद नाही. कारण यातअनेक कार्यकर्त्यांची पाय पिट वाचणार आहे फक्त ही प्रक्रिया जरा लवकर सुरू केली असती तर बरं झाला असतं. नयन डुंबरे, सेक्रेटरी, फोर्टचा राजा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -