घरमुंबईउत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार?

उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार?

Subscribe

राज ठाकरे आज उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मनसे आणि परप्रांतिय वाद महाराष्ट्राला नवा नाही. मनसे पक्षाच्या स्थापना झाल्यावर परप्रांतियांना टार्गेट करणाऱ्या मनसेमुळे परप्रांतियांच्या मनात राज ठाकरे आणि मनसेची भीती होती. मग ती परप्रांतियांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करणे असो वा राज ठाकरेंच्या भाषणात परप्रांतियांविरोधातली राज ठाकरेंची भूमिका असो. मात्र मनसे आणि परप्रांतिय हा वाद आता मिटण्याच्या वळणावर आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आपल्या भाषणातून नेहमीच परप्रांतियांवर टीका करणारे राज ठाकरे आज, २ डिसेंबर रोजी उत्तर भारतीय महापंचायतच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कांदीवली येथी भुराभाई हॉलमध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार असून, राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाचा : राज ठाकरे यांनी स्वीकारले उत्तर भारतीयांचे आमंत्रण

- Advertisement -

महिन्याभरानंतर स्विकारले आमंत्रण

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. १२ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतू, एक महिन्यानंतर संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंनी निमंत्रण स्वीकारल्याचे जाहीर केले. गेल्या काही दिवसांपासून पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. यापूर्वीही राज ठाकरे यांनी जैन, गुजराती समाजाशी संवाद साधला होता.

वाचा : राज ठाकरे यांच्या राजकारणाची दशा आणि दिशा !

- Advertisement -

मनसे विरुद्ध उत्तर भारतीय वाद 

उत्तर भारतीयांबद्दल मनसे किंवा स्वत: राज ठाकरे यांची काय भूमिका आहे हे आख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. उत्तर भारतीयांमुळे येथीस भूमिपुत्रांना त्रास सहन करावा लागत असल्याची भूमिका कायमच मनसेने घेतली आहे. अनेकदा या भूमिकेसाठी मनसे आक्रमक झाली आहे. अनेकदा हिंसक कारवायाही केल्या आहेत. मात्र, आता याच परप्रांतीयांना मुंबईत काय त्रास सहन करावा लागत असून यावर चर्चा करण्यासाठी उत्तर भारतीय महापंचायतच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -