घरमुंबईशिवसेना २३६ व्या वेळी सत्तेतून बाहेर पडणार?

शिवसेना २३६ व्या वेळी सत्तेतून बाहेर पडणार?

Subscribe

शिवसेना सत्तेत राहणार की नाही? याबद्दल काय घोषणा होणार याकडे दसरा मेळाव्याकडे तमाम शिवसैनिकांसह राजकीय पंडितांचे देखील लक्ष लागून राहिले आहे.

आमचे राजीनामे खिशात आहेत. आम्हाला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप शिवसेने केला. त्यावरून नाराज असलेल्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देखील दिली. पण, अद्याप मात्र शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मध्यंतरी काँग्रेसेचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी २३५ वेळा सत्तेला लाथ मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय घोषणा करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर आता शिवसेनेने देखील शक्तीप्रदर्शन करायला सुरूवात केली आहे. ताकद दाखवणारच असे पोस्टर्स देखील आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाहायाला मिळत आहेत. त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सत्तेत एकत्र असलेल्या भाजप – शिवसेनेमध्ये सध्या कोल्ड वॉर पाहायाला मिळत आहेत. वेळोवेळी परस्परांवर टीका करण्याची एकही संधी भाजप – शिवसेनेने सोडली नाही. त्यात आता स्वबळाचा नारा शिवसेना पक्षप्रमुखांनी दिल्यानं आजच्या दसरा मेळाव्यात आपल्याला काय आदेश मिळणार याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.


हे वाचा – शिवसेनेने आतापर्यंत २३५ वेळा सत्तेला लाथ मारली – राधाकृष्ण विखे पाटील

- Advertisement -

शिवसेना सत्तेवर लाथ मारणार?

शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्याला विषेश असे महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून ही परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष असते. त्यात सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा होते का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मी युतीचा कटोरा घेऊन कुणाच्या दारावर जाणार नाही. यापुढे शिवसेना स्वबळावर लढेल अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली, पण अद्याप देखील शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रम आहे. २०१४ साली विरोधात लढल्यानंतर देखील भाजप – शिवसेना सत्तेसाठी एकत्र आले.


तुम्ही हे वाचलंत का? – दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने ‘अशी’ जमवली गर्दी?

- Advertisement -

शिवसेना ‘हवीच’!

किमान लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना सोबत हवी असे मत राज्यातील नेतृत्वाने केंद्रामध्ये मांडल्याची खात्रीलायक माहिती ‘माय महानगर’ला मिळाली आहे. यापूर्वी, देखील भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देखील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा देखील झाली होती. त्यानंतर देखील सामनातून स्वबळाचा नारा दिला गेला. शिवसेना नेत्यांनी देखील त्याचा पुर्नरूच्चार केला. या साऱ्या घडामोडी पाहता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


वाचा – निवडणूक,मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सेनेच्या दसरा मेळाव्यात संदिग्धता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -