घरमुंबईराष्ट्रवादीच्या महिलांकडून बाबा रामदेव यांच्या फोटोला चपलेचा प्रसाद

राष्ट्रवादीच्या महिलांकडून बाबा रामदेव यांच्या फोटोला चपलेचा प्रसाद

Subscribe

जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.

योगगुरू बाबा रामदेव हे सतत काही न काही वक्तव्य करून चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात. अशातच बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी केले होते. त्यावरूनच आता राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यासुद्धा आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. बाबा रामदेव यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, रामदेवबाबा हाय हाय’, समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो, मुखी राम राम बोला याला जोड्याने हाणा. अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेव यांच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनील शिंदे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे, मुंबई मिडिया समन्वयक दिपक पारडीवाला, उत्तर मध्य मुंबईच्या जिल्हाध्यक्षा सुरैना मल्होत्रा, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, महिला, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

नेमके प्रकरण काय?
महिला साडी आणि सलवार सूटमध्ये छान दिसतात. काही घातले नाही तरी छान दिसतात, असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू रामदेव बाबा यांनी केले. महत्त्वाचे म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त विधान केले. एवढेच नव्हे तर, अमृता फडणवीस १०० वर्षे तरुण राहतील, असेही बाबा रामदेव म्हणाले.

- Advertisement -

याशिवाय, साडीमध्ये महिल्या चांगल्या दिसतात. सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात. माझ्या नजरेने पाहिले तर काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.


हे ही वाचा –  ‘खुर्चीत बसणार्‍याला तरी मुख्यमंत्री करायला हवे होते’; सत्तारांचा उध्दव ठाकरेंना टोला

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -