घरमुंबईजागतिक महिला दिन साजरा करणाऱ्या संगणकपरिचालकांना आझाद मैदानाबाहेर रोखले

जागतिक महिला दिन साजरा करणाऱ्या संगणकपरिचालकांना आझाद मैदानाबाहेर रोखले

Subscribe

5 दिवसापासून मुंबईत आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर 2 मार्चला लाठीचार्ज करण्यात आला.

राज्यातील हजारो तरुण तरुणी असलेले संगणकपरिचालक महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कर्मचारु दर्जा व किमान वेतन देण्यासाठी मुंबईत आंदोलन करत आहेत. हे सर्व मराठी तरुण आहेत,मागील 15 दिवसापासून मुंबईत आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर 2 मार्चला लाठीचार्ज करण्यात आला.त्यानंतर सुद्धा मुंबईत वेगवेगळया ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.आज 8 मार्च रोजी मुंबईत आंदोलनासाठी आलेल्या हजारो संगणकपरिचालकांना राणीबाग,भायखळा,सी एस टी, चर्चगेट,मंत्रालय, विधानभवन,आमदार निवास,कुलाबा,नागपाडा,एम आर ए मार्ग,मरिन ड्राईव्ह,वर्षा बंगला आदी भागातून हजारो संगणकपरिचालकांना ताब्यात घेतले. आज जागतिक महिला दिना निमित्त संगणकपरिचालक महिला आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने महिला दिन साजरा करणार होत्या परंतु पोलिसांनी त्यांना आझाद मैदानाच्या गेटवरच रोखले त्यामुळे त्याच ठिकाणी महिलांनी ठिय्या आंदोलन केले व नंतर त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळया पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आले.तरीही जिथे संगणकपरिचालक असतील तिथे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आझाद मैदान मुंबई येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी महिला संगणकपरिचालक येणार असल्याची माहिती भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांना समजताच त्या आझाद मैदान येथे आल्या होत्या परंतु शासनाने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आझाद मैदानात महिला दिन साजरा करू न दिल्याने त्यांनी सर्व महिला समवेत आझाद मैदानाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले त्यावेळी चित्राताई म्हणाल्या की महिलांना महिला दिन साजरा करू न देणे हे पुरोगामी म्हणणाऱ्या राज्य शासनाला शोभत नाही,असे मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

जागतिक महिला दिनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी आलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेणे दुर्दैवी आहे त्याच बरोबर संगणकपरिचालकांना आय टी महामंडळा कडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्यासाठी मागील 15 दिवसापासून आंदोलन सुरूच आहे.स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी संगणकपरिचालकांना वचन देऊन सुद्धा न्याय मिळत नसल्याने संगणकपरिचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.एकीकडे आझाद मैदानात प्रवेश मिळत नसेल आणि मागणी मान्य होत नसेल तर मुंबईत संगणकपरिचालक कोणत्याही ठिकाणी आंदोलन करतील असे संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे म्हणाले.


हेही वाचा – मुंबईत होणार अंशत: लॉकडाऊन, पालमंत्र्यांचे संकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -