घरमुंबईवृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या मोलकरणीला अटक

वृद्ध महिलेवर हल्ला करणाऱ्या मोलकरणीला अटक

Subscribe

उल्हासनगर येथील धोबीघाट परिसरात घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अल्पवयीन तरुणीला अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर येथील धोबीघाट परिसरात घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेची देखभाल करणाऱ्या मोलकरणीने कामाच्या पहिल्याच दिवशी वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला करत दागिने पळवले होते. अखेर याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे महिलेची ओळख पटवत शहाड स्टेशन येथून अल्पवयीन मोलकरणीला अटक करत तीन तोळ्यांचे दागिने जप्त केले आहेत.

नेमके काय घडले?

उल्हासनगर येथील कॅम्प नंबर एक येथील धोबीघाट परिसरात राहणाऱ्या छाबुबाई गरजे (६५) या वृद्ध महिला लकव्याच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना इतर कुणाचाही आधार नसल्याने त्यांच्या देखभालीसाठी ८ सप्टेंबर रोजी एका मोलकरणीला कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, कामाच्या पहिल्याच दिवशी मोलकरणीनेने रात्री साडे अकराच्या सुमारास छबुबाई झोपेत असताना त्यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची चैन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क झालेल्या छबुबाईंने याचा विरोध केला असता, मोलकरणीने पोळपाटने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. तसेच छबुबाई यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्याही काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेने घाबरलेल्या वृद्ध छबुबाई यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला असता, चोर मोलकरणीने घरातून पळ काढला. अखेर या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांद्वारे तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषण विभागाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने छबुबाई आणि त्या महिलेला काम देण्यासाठी मदत करणाऱ्या अशा दोघांकडे शोध लावला असता, शहाड परिसरात ही महिला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपी तरूणीला अटक केली आहे.

- Advertisement -

मोलकरणी म्हणून काम करणारी तरूणी अल्पवयीन असून, या तरूणीचे पालक अंबरनाथ येथे राहतात. मात्र आपल्या कुटूंबापासून ही तरूणी गेले काही वर्ष वेगळी राहत असल्याचे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी सांगितले. ही तरूणी बाल गुन्हेगार असल्याने तिला भिवंडी येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या छबुबाई यांच्यावर फॉर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


हेही वाचा – तीन किलो गांजासह गावठी पिस्तुल जप्त; दोघांना अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -