घरमुंबईनोकरी करणाऱ्यांना सांधेदुखीचा जास्त धोका

नोकरी करणाऱ्यांना सांधेदुखीचा जास्त धोका

Subscribe

कामाला जाणाऱ्या नोकरवर्गामध्ये सांधेदुखीचा त्रास दिवसें दिवस वाढत चालला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सांधेदुखी हा देशातील दुसरा मोठा आजार समस्या असून देशातील २२ ते ३९ टक्के नागरिकांना हा त्रास आहे. सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये २० टक्के ४० ते ५० वयोगटातील नागरिक आहेत. या आजाराने त्रस्त लोकांमध्ये अधिकतः नोकरवर्ग आहे. सांधेदुखी वा गुडघेदुखीच्या तक्रारींचे प्रमाण सध्या वेगाने वाढत चालले आहे. गुडघेदुखी म्हणजे वयोपरत्वे घेणारी व्याधी असली, तरी तरुण वयात खेळताना दुखापत झाली, तर गुडघ्याला मार बसू शकतो. तसे हे किचकट व खूप काळ छळणारे दुखणे आहे. योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही, किंवा निदान चुकले तरी गंभीर अशा शारीरिक परिणामांना सामोरे जावे लागते.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) द्वारे दिलेल्या माहितीनुसार सांधेदुखीचा त्रास असलेल्या ८० टक्के रुग्णांना आपल्या हालचाली पुर्णतः करता येत नाही. यातील २५ टक्के रुग्णांना आपल्या दिनचर्येतील नेहमीची कामही करता येत नाहीत. याबाबत अधिक माहिती देताना मॅक्स स्मार्ट सुपर स्पेशल हॉस्पीटलचे डॉक्टर जे. महेश्वरी यांनी सांगितले की,  “सांधे एकमेकांवर अधिक प्रमाणात घासल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. यामुळे दुखापत होणे, वात येणे आणि स्नायु गोठणे अशा प्रकारचे आजार शारीरात बळावतात. शारीरिक श्रम करत असलेल्या लोकांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात बघायला मिळतो. शारीरिक कामांमुळे सांधे हे मोठ्या प्रमाणात झिजतात त्यामुळे सांधेदुखीचा त्रास शारीरात बळावतो.”

- Advertisement -

डॉक्टरांचा सल्ला

योग्यवेळी जेवण, क्षमतेनुसार वजन उचलने, नियमीत व योग्य व्यायाम केल्याने गुडघेदुखी कमी होऊ शकते. गुडघेदुखीचा त्रास जास्तच वाढला असता जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी करण्याव्यतिरीक्त पर्याय उरत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -