घरमुंबईरुग्णाच्या सोयीसाठी केईएम बदलणार ओपीडीची वेळ

रुग्णाच्या सोयीसाठी केईएम बदलणार ओपीडीची वेळ

Subscribe

सार्वजनिक सुट्यांच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ओपीडीसाठी रुग्णांची दुपटीने संख्या वाढलेली असते. अनेक तास ओपीडीमध्ये उभं राहिल्यानंतरच रुग्णाचं रजिस्ट्रेशन होतं. तर, अनेकदा वेळेअभावी रुग्णाला माघारीही फिरावं लागतं. पण, असं होऊ नये यासाठी सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या नोंदणी अर्धातास आधीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजे किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच परळ येथील केईएम रुग्णालय हे सर्व देशातील रुग्णांसाठी हक्काचे रुग्णालय आहे. संपूर्ण देशातील रुग्ण केईएम रुग्णालयात येत असल्याने या ठिकाणी बाह्यरुग्ण विभागात नेहमीच गर्दी असते. त्यासोबतच, मुंबईसह उपनगरातूनही केईएममध्ये विश्वासाने बरेच रुग्ण दाखल होतात. त्यामुळे हॉस्पिटलचा भार आणखी वाढतो. तसेच सार्वजनिक सुट्यांच्या दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ओपीडीसाठी रुग्णांची दुपटीने संख्या वाढलेली असते. अनेक तास ओपीडीमध्ये उभं राहिल्यानंतरच रुग्णाचं रजिस्ट्रशन होतं. तर, अनेकदा वेळेअभावी रुग्णाला माघारीही फिरावं लागतं. पण, असं होऊ नये यासाठी सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या नोंदणी अर्धातास आधीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – केईएम रुग्णालयात मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांची संख्या अधिक

- Advertisement -

७.३० वाजल्यापासून सुरू होईल ओपीडी

रविवारी सुट्टीमुळे ओपीडी बंद असतात. त्याचा परिणाम सोमवारी होतो. असाच प्रकार सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी ओपीडी बंद असल्याकारणाने पाहायला मिळतो. त्या गर्दीचं नियोजन करणं अनेकदा कठीण होतं. त्यामुळे, ऐरवी ८ वाजता सुरू होणारं ओपीडी रजिस्ट्रेशन हे सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी ७.३० वाजल्यापासून सुरू होईल. जेणेकरुन त्याचं नियोजन करणं सोपं होईल.

हेही वाचा – केईएम रुग्णालयात प्लास्टर पडून ३ जण जखमी

- Advertisement -

सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी किमान १६ हजार रुग्ण

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालय हे मुख्य आहे. मुंबईतीलच नव्हे तर देशातील कानाकोपऱ्यातील रुग्ण या ठिकाणी उपचारांसाठी येत असतात. तपासणी नोंदीसाठी नोंदणी विभागात पहाटे पासूनच गर्दी होते. सकाळी आठ वाजल्यापासून नोंदणी विभाग सुरु केला जातो. त्या आधी दोन तास रुग्ण येथे वाट पाहत असतात. बाहेरुन येणारे रुग्ण नोंद करण्यासाठी आदल्या रात्री येऊन फूटपाथवर आश्रय घेतात. तर, उपनगरांतील रुग्ण पहाटेच घरातून निघून केईएम रुग्णालयाकडे धाव घेतात. दुपारची रुग्ण नोंदणी देखील असली तरीही ही नोंद संपत नाही. असे दररोज आठ हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात येतात. एखाद्या सार्वजनिक सुटीच्या दुसऱ्या दिवशी तर ही संख्या दुप्पट होते. अशा वेळी गर्दीचे नियोजन होत नाही. कित्येक रुग्ण माघारी फिरतात. अशा रुग्णांच्या सोयीसाठी सुट्ट्यांच्या दुसऱ्या दिवशी नोंदणीच्या वेळेत बदल करुन ती अर्धा तास आधी सुरू होणार असल्याचे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

नवीन वर्षांचा संकल्प म्हणून सुट्ट्यांच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण नोंदणी सकाळी ८ वाजता सुरू न करता ७.३० वाजता सुरू केली जाणार आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी गर्दीच्या नियोजनासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांना फायदा होईल. या वर्षातील किमान ८० दिवस अशी ओपीडी असू शकते. ज्यामुळे रुग्णांची गर्दी नियोजन करणं सोपं होईल. बाकी जी दररोजची ओपीडी असते ती नियोजन करण्यासारखी असते. पण, सुट्ट्यांच्या नंतर होणारी गर्दीचं नियोजन करणं कठीण होतं. त्यामुळे हा नवीन संकल्प केला आहे. ज्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.

-डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -