घरनवी मुंबईनवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार - गणेश नाईक

नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविणार – गणेश नाईक

Subscribe

महाविकास आघाडीने कितीही वल्घना केल्या तरी नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविणार, असा ठाम विश्वास आमदार गणेश नाईक यांनी नेरुळ येथे व्यक्त केला.

महाविकास आघाडीने कितीही वल्घना केल्या तरी नवी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकविणार, असा ठाम विश्वास आमदार गणेश नाईक यांनी नेरुळ येथे व्यक्त केला. देशातील १३५ कोटी जनतेपैकी अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत कोव्हिड लस देण्याचा निर्धार केला. उर्वरित १३२ कोटी जनतेला अध्यापी लस द्यायची आहे. केंद्र सरकारला पुढच्या टप्प्यात सामान्य नागरिकांना लस मोफत देता आली नाही. राज्य शासनाने जर याबाबत काही पुढाकार घेतला नाही. तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून १५ लाख नवी मुंबईकरांना मोफत कोव्हिड लस देऊ, असे आश्वासन यावेळी नाईकांनी दिले. त्यासाठी पालिका आयुक्तांकडे अगोदरच पाठपुरावा सूरु असल्याचे नाईकांनी सांगितले.

सिवूडस दारावे प्रभाग ९२ मधील माजी नगरसेवक सुनील पाटील व माजी नगरसेविका सरस्वती पाटील यांच्या पुढाकाराने दारावे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गणेश नाईक बोलत होते. नवी मुंबईच्या विकासासात नावीन्य आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यामुळे जनता कामाला प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नवी मुंबई जिंकण्याची वलघना महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, नवी मुंबईत भाजपचा महापौर बसेल, असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे, बाळाराम पाटील, माजी नगरसेवक रवींद्र इथापे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे, अरुण हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

बीडमध्ये शिवसंग्रामला मेगा गळती, १५० कार्यकर्त्यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -