घरताज्या घडामोडीबॉलिवूडला पुन्हा धक्का, अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

बॉलिवूडला पुन्हा धक्का, अभिनेते राजीव कपूर यांचे निधन

Subscribe

बॉलिवूड अभिनेते, निर्माते राजीव कपूर यांचे मंगळवारी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५८ वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी राजीव कपूर यांच्या निधनाची बातमी सांगितली आहे. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे छोटे भाऊ म्हणजे राजीव कपूर होत. काही महिन्यांपूर्वी अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या दु:खातून कुटुंबिय सावरत नाही तर आता राजीव कपूर हे जग सोडून गेले आहेत. त्याच्या जाण्याने कपूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, राजीव कपूर यांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास ह्दय विकाराचा अचानक झटका आला. त्यानंतर भाऊ रणधीर कपूर यांनी त्यांना चेंबूरच्या इनलेक्स रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी राजीव कपूर यांना मृत घोषित केले. बॉलिवुडमध्ये कपुर परिवारावर अल्पावधीत दुसऱ्यांदा आलेली ही शोककळा आहे. काही महिन्यांपूर्वीच ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपुर्ण कुटुंब दुःखाच्या छायेत होते. त्यातच राजीव यांचे अकाली निधन हे कपुर कुटुंबाला तसेच बॉलिवुडला चटका लावून जाणारी अशी घटना आहे.

मंगळवारी सकाळी राजीव कपूर नाश्ता करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही कळण्याच्या आधीच त्यांना ह्दय विकाराचा झटका आला. त्यानंतर नजीकच्या अशा चेंबूरमधील इनलेक्स रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. रणधीर कपूर हे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत होते. भावाच्या मृत्यूची बातमी सांगताना, ‘मी माझ्या सर्वात लहान भावाला गमावले, असे ते म्हणाले. डॉक्टरांनी खूप प्रयत्न करुनही ते त्याला वाचवू शकले नाही’, अशा शब्दात अभिनेते रणधीर कपूर यांनी आपल्या दुखद भावना व्यक्त केल्या. अभिनेत्री नीतू कपूरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून राजीव कपूर यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. राजीव कपूर दिग्दर्शित यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाला खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याचबरोबर ‘एक जान हें हम’ या सिनेमातही त्यांनी अभिनय केला होता. ऋषी कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘प्रेम ग्रंथ’ या सिनेमाचे दिग्दर्शनही राजीव कपूर यांनी केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – सुसाईड नोट लिहून अभिनेत्री कुलजीत रंधावाने ‘या’ साठी केली होती आत्महत्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -