घरनवी मुंबईनवी मुंबईला कोव्हिशील्डचा आणखी २० हजार लसींचा साठा

नवी मुंबईला कोव्हिशील्डचा आणखी २० हजार लसींचा साठा

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४९ केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: ७ हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४९ केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: ७ हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण होत आहे. लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण प्रक्रियेला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जात असून आत्तापर्यंत १ लाख ७५ हजार ८७३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये सोमवारी शासनाकडून आणखी २० हजार कोव्हिशील्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत अहोरात्र २४ x७ लसीकरण करण्यात येत आहे. तसेच तुर्भे येथील रामतनू माता बाल रूग्णालय आणि सर्व २३ नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण केले जात आहे. त्यासोबतच वाशी सेक्टर ५ येथील ईएसआयएस रूग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रामध्ये ४ बूथ सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे २१ खासगी रुग्णालयांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या २५० रुपये प्रती डोस दराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे.

- Advertisement -

१ एप्रिलपासून ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले असून अशा ७४१२४ नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. सध्या नव्याने पहिलाच डोस घेणाऱ्या नागरिकांना कोव्हिशील्ड लसीचा डोस दिला जात आहे. कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन झाल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसराही डोस कोव्हॅक्सिनचाच घेणे आवश्यक असून तो ४ ते ६ आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्याची सुविधा वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिका रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोव्हिशील्ड अथवा कोव्हॅक्सिन यापैकी ज्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याच लसीचा दुसरा डोस विहित कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. ४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने कोरोनापासून बचावासाठी अतिशय सुरक्षित असलेले कोविड लसीकरण करून घ्यायचे असून याकरता नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व नागरी आरोग्य केंद्र पातळीवरही मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

corona vaccination : अमेरिकेत प्रौढांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -