घरनवी मुंबईहिवाळी ऋतूमध्ये अवकाळी सरी; नवी मुंबईकरांमध्ये आजार वाढण्याची भिती

हिवाळी ऋतूमध्ये अवकाळी सरी; नवी मुंबईकरांमध्ये आजार वाढण्याची भिती

Subscribe

नवी मुंबईत हवामान खात्याने अंदाजानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईकरांच्या दिवसाची सुरु अवकाळी जलधारांनी सुरु झाल्याने दाणादाण उडाली.

हिवाळी ऋतूच्या महिन्यात खरंतर चाहूल लागते ती गुलाबी थंडीची. मात्र डिसेंबर महिना सुरु झाला तरी थंडी काही जाणवली नाही. थंडीचा महिना सुरु असतानाच बुधवारी नवी मुंबईत हवामान खात्याने अंदाजानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईकरांच्या दिवसाची सुरु अवकाळी जलधारांनी सुरु झाल्याने दाणादाण उडाली. नवी मुंबई बरोबरच पनवेल, ठाणे, मुंबईतही पावसाने हजेरी लावल्याने ठाणे-पनवेल, सायन-पनवेल, पनवेल-कल्याणकडे शहरातून जाण्यार्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ घटल्याचे पहायला मिळाले. नवी मुंबईतील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. तर एनएमएमटीच्या बसेसमध्ये पाणी शिरल्याने रस्त्यालगत उभ्या करण्यात आल्या होत्या. नेहमीप्रमाणे शहरातील भुयारी मार्गातही पाणी साचले होते. शहरातील अनेक रस्त्यावर खोदकामे सुरु असून पावसाचे पाणी खोदलेल्या खड्ड्यात साचले होते. 1 डिसेंबरपासून सुरु होणार्या शाळा नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पुढे ढकलण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांनी घरी राहून ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरविले. मागील दोन महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि हवामान चक्रात होणारा बदल यामुळे सर्दी, तापासह इतर साथीचे आजार बळावण्याच्या भितीने नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

ऑक्टोबरमध्ये हिट आणि पावसाळा अनुभवल्यानंतर नोव्हेंबरमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पुन्हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने शहरात हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस सुरु झाल्यांनतर बंदिस्त झालेल्या छत्र्या पुन्हा बाहेर काढाव्या लागल्या. नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, बेलापूर या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली. दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका हा पालिकेच्या खोदकामांना बसला रबाळे-ऐरोली मार्गावर केंद्र शासनाच्या योजनेनुसार पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्या ठिकाणी खोदलेल्या भागात पावसाचे पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. मुकुंद कंपनी, ऐरोली रेल्वे स्थानकानजीक भुयारी मार्ग, महापे, तुर्भेतील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचले होते.

- Advertisement -

तुरळक दुचाकी, रिक्षा रस्त्यावर

एसटीचा संप सुरु असल्याने ठाणे-बेलापूर, पनवेल-वाशी, वाशी-घणसोली, ऐरोली-कळवा या मार्गावरील प्रवाशांनी खासगी वाहने व रिक्षाची वाट धरली होती. मात्र सकाळ दाखल झालेल्या पावसामुळे गजबजलेल्या या मार्गावर तुरळक रिक्षा धावताना दिल्या. कामानिमित्ताने बाहेर पडलेल्यांची चारचाकी वाहने परिवहनच्या बसेस रसत्यावर धावल्या. तर दुचाकी वाहनांची एरव्ही असणारी गर्दीदेखील रस्त्यावर तितकी दिसली नाही.

एनएमएमटीच्या बसेस पडल्या बंद

एनएमएमटी बसेसच्या फेर्या या एसटी बंद असल्याने वाढविण्यात आल्या होत्या. मात्र पावसामुळे शिरवणे, ऐरोली, घणसोली, महापेच्या रस्त्यावर जुन्या बसेस बंद पडल्याने उभ्या करण्यात आल्या होत्या. परिवहनच्या वातानुकुलित बसेसमध्ये सकाळी चाकरमन्यांची गर्दी वगळता दुपारच्यावेळी गर्दी ओरसली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

ठाणे जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाच्या जागी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -