घरनवी मुंबईघोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद

घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद

Subscribe

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्यावर असलेला घोडबंदर (वरसावे) टोलनाका अखेर येत्या २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून पूर्णपणे बंद होणार आहे.

सध्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदर परिसरात वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असलेला मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर रस्त्यावर असलेला घोडबंदर (वरसावे) टोलनाका अखेर येत्या २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

या टोलनाक्यावर वाहतूक कोंडी व्हायची. बराच वेळ नागरिकांना कोंडीत अडकून पडावे लागे. त्याचबरोबर टोल वसुलीचे काम करणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीकडून या रस्त्याची नीट देखभालही केली जात न्हवती. त्यामुळे या टोलनाक्याची मुदतवाढ रद्द करून हा टोलनाका कायमचा येथून काढून टाकावा , अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. हा टोलनाका असल्याने वाहतूक कोंडी होते , नागरिकांना , वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो , वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते व हा टोलनाका फक्त ‘आयआरबी’ कंपनीच्या फायद्यासाठी चालवला जात असल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला होता. हा टोलनाका येथून कायमचा बंद करण्याची मागणी स्थानिक आमदार म्हणून सरनाईक यांनी केल्यानंतर त्यावर एमएसआरडीसी खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही निर्णय घेतला आहे. या टोलनाक्याला दिलेली मुदतवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे हा टोलनाका हद्दपार होणार आहे.

- Advertisement -

घोडबंदर टोलनाका २३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. त्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी २४ ला येथे असलेल्या टोलनाक्यावरील टोलवसुलीच्या टपऱ्या संबंधित विभागाने लगेचच काढून टाकाव्यात. टोलनाक्याचे स्ट्रक्चर काढून टाकल्याने येथे वाहतूक सुरळीत होण्यास आणखी मदत होईल असे सरनाईक यांनी म्हटले आहे.

ठाणे ते घोडबंदर रस्त्यावर वेळोवेळी तीव्र वाहतूक कोंडी होते. वाढती वाहन संख्या व वाहतूक कोंडी पाहता गायमुख ते वरसावे दरम्यान उन्नत मार्ग (एलिव्हेटेड फ्लायओव्हर) तयार करण्याची मागणीही  सरनाईक यांनी आधीच केली आहे. भविष्यात एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे हे कामही येथे सुरु होणार आहे. त्यामुळे या कामाला हा टोलनाका अडथळा ठरू शकेल असा हा टोलनाका तात्काळ येथून हटवावा असा आग्रह सरनाईक यांनी धरला होता. त्याला अखेर यश आले आहे. घोडबंदर टोलनाका बंद झाला आहे. आता पुढच्या टप्प्यात मुलुंड व दहिसर टोलनाका अशाच पद्धतीने रद्द व्हावा व ठाणे – मीरा भाईंदरच्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंतीही आमदार सरनाईक यांनी मंत्र्यांना केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -