घरक्रीडाIND vs ENG : जो रूटने रचला अनोखा विक्रम; इंझमामला टाकले मागे 

IND vs ENG : जो रूटने रचला अनोखा विक्रम; इंझमामला टाकले मागे 

Subscribe

जो रूटने भारताविरुद्ध २१८ धावांची खेळी केली. 

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने ३७७ चेंडूत १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१८ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पाचवे द्विशतक ठरले. तसेच या द्विशतकामुळे रूटने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा रूट हा क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी आपल्या १०० व्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकच्या नावावर होता. इंझमामने २००५ मध्ये भारताविरुद्धच बंगळुरू येथे १८४ धावांची खेळी केली होती.

षटकार मारत द्विशतक पूर्ण

रूटने १९६ धावांवर असताना रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर षटकार मारत आपले द्विशतक पूर्ण केले. षटकार मारून आपले द्विशतक पूर्ण करणारा रूट हा इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला. रूटचे हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे आणि मागील तीन सामन्यांत दुसरे द्विशतक ठरले. त्यामुळे आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा रूट हा पहिलाच फलंदाज ठरला.

- Advertisement -

इंग्लंडचा १५ वा खेळाडू

रूटने २०१२ मध्ये भारताविरुद्धच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. आता त्याने १०० कसोटी सामन्यांचा टप्पा पार केला असून इतके सामने खेळणारा तो इंग्लंडचा १५ वा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ८००० हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत.


हेही वाचा – रूटचा ‘डबल’ धमाका; दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड ८ बाद ५५५ 

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -