घरनवी मुंबईNavi Mumbai Metro : उद्यापासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत; उद्घाटनाशिवाय धावणार 'या'...

Navi Mumbai Metro : उद्यापासून मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत; उद्घाटनाशिवाय धावणार ‘या’ मार्गावर

Subscribe

नवी मुंबई : नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 वर शुक्रवार, दि. 17 नोव्हेंबर 2023 पासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या मेट्रोच्या मार्गिकेचं उद्घाटन करण्यात येणार होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानंतर नवी मुंबई मेट्रो धावणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Navi Mumbai Metro From tomorrow Metro will be at the service of Navi Mumbaikars Will run on Belapur to Pendhar route without inauguration)

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या 11.10 किमी लांबीच्या मार्ग क्र. 1 चे काम हाती घेण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण 11 स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे. मार्ग क्र. 1 ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र. 1 वर धावणार्‍या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्नंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता (commercial operation) सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून 17 नोव्हेंबर 2023 पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “…जय भवानी, जय शिवाजी म्हणत मते मागणार”, उद्धव ठाकरेंचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

- Advertisement -

ही मेट्रो सेवा दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी 3 वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता असणार आहे. तर दिनांक 18 नोव्हेंबर 2023 पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री 10 वाजता होणार आहे. सदर मार्ग क्र. 1 वर दर 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

हेही वाचा – Common Password : 70 टक्के सोप्पे पासवर्ड होतात एका सेकंदात हॅक!; तुमचाही नाही ना असाच पासवर्ड

एकनाथ शिंदे म्हणाले की, बहुप्रतीक्षित बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे, महाराष्ट्र सरकारने सिडकोला नवी मुंबईतील नागरिकांसाठी लवकरात लवकर मेट्रो सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, अधिकृत सार्वजनिक कार्यक्रम मेट्रो सेवा मेट्रो लाईन क्रमांक 1 वर बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान वाट न पाहता सुरू करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी सिडकोचे अभिनंदन केले आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, मेट्रो सेवा नवी मुंबईत चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो मार्गांचे मजबूत जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि सिडको नवी मुंबईत मेट्रोचे जाळे अतिशय प्रभावीपणे राबवत आहे.

सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर म्हणाले की, 17 नोव्हेंबर 2023 पासून नवी मुंबई मेट्रो लाईन क्रमांकावर बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रोमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईला जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासाचा एक कार्यक्षम पर्याय मिळेल. वेगाने विकसित होत असलेल्या खारघर आणि तळोजा नोड्सना मेट्रोच्या माध्यमातून सीबीडी बेलापूरशी चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. मेट्रोच्या सुधारित आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय शहर म्हणून महत्त्व वाढेल.

हेही वाचा – अमित शहांप्रमाणेच नितीश कुमारकडूनही आश्वासन; उदय सामंतांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

11 स्थानकांचा समावेश

उद्यापासून सुरू होणाऱ्या नवी मुंबईच्या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये सध्या 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाणार आहे. त्यामुळे  या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -