घरनवी मुंबई'रेमडेसिवीर कुठेच नाही, टाहो कुणाकडे फोडायचा? सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं' -...

‘रेमडेसिवीर कुठेच नाही, टाहो कुणाकडे फोडायचा? सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं’ – गजानन काळे

Subscribe

राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवड जाणवत आहे. केंद्राकडून कमी प्रमाणात रेमडेसिवीर पुरवली जात असल्यामुळे राज्यात तुटवडा भासत असल्याचं राज्य सरकारने म्हटलं आहे. हा तुटवडा लवकरच भरुन निघेल, असं राज्य सरकार सांगत आहे. मात्र, नवी मुंबईत ग्राउंड लेव्हलवरील परिस्थितीत प्रचंड भयानक असल्याचं चित्र आहे. यावरुन मनसेचे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी राज्य सरकार आणि प्रशासनावर टीकास्त्र डागलं आहे.

“आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकाही खाजगी रुग्णालयांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडुन एक ही रेमडेसिवीर देण्यात आले नाही. म्हणजेच ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी, उल्हासनगर या मनपातील ही खासगी रुग्णालयांना ही एकही रेमडेसिवीर आज मिळालं नाही. फक्त घोषणा. काळ्या बाजारात उपलब्ध नाही आणि शासकीय यंत्रणा जबाबदारी घेऊन पुरवत नाहीत. आता रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाकडे टाहो फोडायचा ते ही एकदा सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावे,” असं गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आजच्या दिवसात नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील एकाही खाजगी रुग्णालयांना ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडुन एक ही रेमडेसिवीर…

Posted by Gajanan Kale MNS on Tuesday, 27 April 2021

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. मोठ्या प्रमाणात बेड्स, ऑक्सिजनसह रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. वाढत्या रुग्णांमुळे सरकारी आणि खासगी रुग्णालये फुल आहेत.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -