घरनवी मुंबईपेन्शन योजना, शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणार; निर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ग्वाही

पेन्शन योजना, शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणार; निर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची ग्वाही

Subscribe

मागील सहा वर्षांमध्ये निवडून दिलेल्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शिक्षकांचे प्रश्न आणि कामे मार्गी लावली नव्हती त्यामुळे नाराज असलेल्या शिक्षकांनी शिक्षक म्हणून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून दिला आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती शिक्षकांविषयी असणार्‍या इतर मागण्यांसाठी यापुढे आपण अग्रक्रमाने प्रथम सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे घवघवीत मतांनी विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाचे निर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई: मागील सहा वर्षांमध्ये निवडून दिलेल्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारची शिक्षकांचे प्रश्न आणि कामे मार्गी लावली नव्हती त्यामुळे नाराज असलेल्या शिक्षकांनी शिक्षक म्हणून आपल्या हक्काचा उमेदवार निवडून दिला आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती शिक्षकांविषयी असणार्‍या इतर मागण्यांसाठी यापुढे आपण अग्रक्रमाने प्रथम सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे घवघवीत मतांनी विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाचे निर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे म्हात्रे आणि शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यातील लढतीत म्हात्रे यांनी ९६८६ अधिक मते मिळवत पाटील यांना पराभूत केले. कोकण शिक्षक मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी ९८ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी नेरुळ येथील आगरी कोळी भवनात मत मोजणी होत निकाल जाहीर करण्यात आला.
मत मोजणीत भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना २०६८३, बाळाराम पाटील १०९९७, धनाजी पाटील १४९०, उस्मान रोहेकर ७५, तुषार भालेराव ९०, रमेश देवरुखकर ३६, राजेश सोनावणे ६३, संतोष डामसे १६ इतकी मते मिळाली तर नोटा आणि बाद १६१९ मते पडली. एकूण ३५ हजार ६९ मते मिळाली.
कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात विजयी जल्लोष साजरा केला मंत्री रवींद्र चव्हाण पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत शिक्षक समितीच्या सदस्य आणि म्हात्रे यांच्या पत्नी स्नेहल म्हात्रे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे, माझे स्थायी समिती सभापती तुकाराम म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आनंदोत्सव साजरा केला.

कोट्यातील मते
पहिल्याच फेरीपासून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मतमोजणी मध्ये आघाडी घेतली होती प्रथम पसंतीच्या मतदानातून सुरू झालेला विजय प्रवास पहिल्याच फेरीत कोट्यातील मते घेऊन स्थिरावला. कोट्यातील मतांसह २०६८३ मते ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मिळवले त्यामुळे पहिल्याच फेरी त्यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

- Advertisement -

आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत पहिल्या फेरीत प्रचंड मताधिक्याने कोणताही उमेदवार निवडून आला नव्हता परंतु यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पहिल्याच फेरीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. तर महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून येणार्‍या बाळाराम पाटील यांनी शिक्षकांची कोणतीच समस्या मार्गे न लावल्याने त्यांना शिक्षकांनी नाकारून आपल्यातलाच शिक्षक आमदार निवडून आणायचा उचललेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण केला आहे.
– प्रशांत ठाकूर,
आमदार, पनवेल विधानसभा मतदारसंघ

शिक्षक परिषदेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या अनेक समस्यावर आवाज उठवला आहे. शिक्षकांनी शिक्षक आमदार निवडून देण्याची भूमिका ही विजयासाठी महत्वाची ठरली आहे. हा विजय शिंदे -फडणवीस सरकारचा आहे.
-रवींद्र चव्हाण,
कॅबिनेटमंत्री, राज्य सरकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -