घरनवी मुंबईमाता-बाल रुग्णायल्यासाठी १५ कोटींची तरतूद; महापालिकेने मागवल्या निविदा

माता-बाल रुग्णायल्यासाठी १५ कोटींची तरतूद; महापालिकेने मागवल्या निविदा

Subscribe

दिघा परिसरातील माता-बाल रुग्णालयाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून या परिसरासाठी स्वतंत्र माता-बाल रुग्णालय उभारावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

दिघा परिसरातील माता-बाल रुग्णालयाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असून या परिसरासाठी स्वतंत्र माता-बाल रुग्णालय उभारावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन या ठिकाणी माता-बाल रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एमआयडीसीकडून भूखंड हस्तांतरितही झाला असून रुग्णालय उभारण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते पूर्ण झाले की लवकरच रुग्णालय उभारण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न खर्‍या अर्थाने सुटणार आहे.

दिघा येथे माता बाल रुग्णायल उभारण्यासाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली होती. रुग्णालय उभारण्याचा खर्चही तितकाच आहे. माता-बाल रुग्णालय उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहे. निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन महापालिकेच्या वतीने प्रत्यक्षात काम सुरू करण्याचे कार्यादेश दिले जातील.
– संजय देसाई, शहर अंभियता

- Advertisement -

दिघा परिसर हा सर्वाधिक झोपटपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. याशिवाय या परिसरात मध्यमवर्गीय आणि गरीब लोकवस्तीचा भागही मोठा आहे. या परिसरातील गर्भवती महिलांना उपचारासाठी, प्रसुतीसाठी ऐरोली रुग्णालय किंवा वाशी येथील महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात जावे लागते. आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने खासगी रुग्णालयांचा खर्च येथील महिलांना परवडणारा नसतो. मात्र ऐरोली रुग्णालय दिघ्यापासून दूर असल्याने अनेक वेळा रुग्णालयात पोहोचेपर्यंत महिलांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दिघ्यातून ऐरोलीत जाण्यासाठी पहिल्यांदा ठाणे-बेलापूर मार्गावर यावे लागते. तिथून रिक्षा किंवा बस पकडून ऐरोलीत पोहोचता येते. यात वेळ आणि पैसे दोन्हीचा अपव्यय होतो.

दिघा परिसराची लोकसंख्या पाहता या ठिकाणीच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारावे, अशी मागणी स्थानिक, लोकप्रतिनिधींकडून वारंवार होत होती. त्यानुसार, महापालिकेनेही या ठिकाणी रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठी जागेची मोठी अडचण होती. मात्र त्यासाठी पाठपुरावा करून, एमआयडीसीकडून वन भूखंड मिळवण्यात महापालिकेला यश आले. त्यानंतर महापालिकेने या दिघा परिसरासाठी स्वतंत्र माता-बाल रुग्णालय उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार या ठिकाणी माता-बाल रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करून त्यानुसार रुग्णालय उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रुग्णालय उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून या निविदा अंतिम टप्प्यात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

Mega block Update : कळवा-दिवा धीम्या मार्गावर २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -