घरनवी मुंबईग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे सरसकट नियमित करा - आमदार मंदा म्हात्रे

ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे सरसकट नियमित करा – आमदार मंदा म्हात्रे

Subscribe

नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली २५० मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला.

नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली २५० मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला. परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. तसेच नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे सिटी सर्व्हेक्षण पूर्ण करून त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड देणे, ग्रामस्थांना वैयक्तिकरित्या आपल्या घरांचा विकास करण्याकरता ४ एफएसआय देणे. तसेच त्यांना रोजगारासाठी २५ टक्के कमर्शियल देणेसंदर्भात बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली, अशी माहिती सीबीडी येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजप महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रदीप गवस उपस्थित होते.

यावेळी आमदार म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली २५० मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व सदरबाबत शासन निर्णय आणला. या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु निर्णय करताना काही त्रुटी राहून गेल्या आहेत. नवी मुंबईतील ग्रामस्थांनी मूळ गावठाणापासून जी गरजेपोटी बांधकामे केलेली आहेत, ती सर्वच बांधकामे सरसकट नियमित करणे आवश्यक आहे. ग्रामस्थांना वैयक्तिकरित्या आपल्या घरांचा विकास करण्याकरता ४ एफएसआय दिल्यास सोयीचे होईल. तसेच ग्रामस्थांनी कमर्शियल बांधकामे केलेली असताना त्यांना रोजगारासाठी २५ टक्के कमर्शियल देखील देणे गरजेचे आहे. याकरता ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ही विशिष्ट दर लावून नियमित करण्याची आवश्यकता आहे.

- Advertisement -

राज्याचे विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ पर्यंतची सर्व घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. मी २००४ पासून सातत्याने लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याच्या मुद्द्याद्वारे हे प्रश्न विधानमंडळ सभागृहात घेत आहेत. त्याबाबत सततच्या बैठका व पाठपुरावा करत आहे. शासनाने आतापर्यंतची सर्वच घरे सरसकट नियमित करण्याची आवश्यकता असल्याने मी आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे.

विस्तारित गावठाणातील घरांचे सिटी सर्वेक्षण केल्यास त्यांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क म्हणून प्रॉपर्टी कार्ड देण्याबाबत मी गेले अनेक वर्षे लढा देत आहे. मूळ गावठाणचे प्रॉपर्टी कार्ड वाटप केले आहेत. परंतु विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण केल्यास ग्रामस्थांची सर्व घरे ही अधिकृतरित्या मालकी हक्काची होणार आहेत. नवी मुंबईतील विस्तारित गावठाणाचे सिटी सर्वेक्षण बेलापूर गावातून सुरु करण्यात आले होते. तसेच दिवाळे, सारसोळे व सानपाडा गावातील सिटी सर्वेक्षण सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलेले आहेत. हे प्रश्न मार्गी लागल्यास ग्रामस्थांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा मुद्दा येणाऱ्या अधिवेशनात घेण्यात येणार असल्याचेही मंदा म्हात्रे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – 

Russia Ukraine War: ३६ देशांच्या फ्लाईट्स रशियाकडून बॅन, युरोपियन देशांच्या निर्बंधांनंतर रशियाचा पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -