घरनवी मुंबई दिघा ईश्वरनगर-गणपतीपाडा भुयारी मार्ग कामाचा आढावा

 दिघा ईश्वरनगर-गणपतीपाडा भुयारी मार्ग कामाचा आढावा

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा परिसरात ईश्वरनगर ते गणपती पाडा भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक व स्थानिक माजी नगरसेवक जगदीश गवते यांच्या अखंड पाठपुराव्याने पुर्ण झाली आहे. काल या भुयारी मार्गाच्या कामाचा आढावा रेल्वेचे अधिकारी, नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी समाजसेवक राजू यादव, संजय वर्धमाने, प्रविण मिश्रा, शशी सकपाळ, गणेश गुजर, संतोष चोरट,राजेंद्र पाल, भरत शिंदे, बसवराज कुस्सा, खोले, विजय शेलार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा परिसरात ईश्वरनगर ते गणपती पाडा भुयारी मार्गाची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक व स्थानिक माजी नगरसेवक जगदीश गवते यांच्या अखंड पाठपुराव्याने पुर्ण झाली आहे. काल या भुयारी मार्गाच्या कामाचा आढावा रेल्वेचे अधिकारी, नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी समाजसेवक राजू यादव, संजय वर्धमाने, प्रविण मिश्रा, शशी सकपाळ, गणेश गुजर, संतोष चोरट,राजेंद्र पाल, भरत शिंदे, बसवराज कुस्सा, खोले, विजय शेलार आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
एमआरव्हीसीच्या माध्यमातून दिघा रेल्वे स्थानकाचे काम पुर्ण करण्यात आले असून लवकरच याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. दिघा रेल्वे स्थानकातून पनवेल, वाशी ते कल्याणला जोडण्यासाठी एमएमआरडीए व एमआरव्हीच्या माध्यमातून ऐरोली-कळवा इलेव्हेटड पुलाचे काम देखील सध्या निर्माणधीन आहे. मात्र या मार्गावरील ईश्वरनगर, बालीनगर, अनंतनगर, मुकूंंद कंपनी परिसरातील नागरिकांना सावित्रीनगर,गणपती पाडा, विटावा येथे ये-जा करताना कल्याणवरुन आलेल्या मालगाडीच्या रेल्वे ट्रॅकमुळे मालगाडी आल्यास गाडी खालून जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत होती.

भुयारी मार्ग उभारण्यसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा

- Advertisement -

भविष्यात या ठिकाणी इलेव्हेटड पुलाचे काम झाल्यानंतर नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी मुकूंद कंपनी मार्गी वळसा घालावा लागणार होता. ही बाबत लक्षात घेता आणि भविष्यात कोणत्याही नागरिकांचा रेल्वेच्या मालगाडी खालून जाता येता जीवह जाऊ नये यासाठी शिंदे गटाचे समर्थक माजी नगरसेवक जगदीश गवते यांनी एमआरव्हीसी, एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. रेल्वे विकास कार्पोरेशनच्या माध्यमातून नियोजित असणार्‍या ईश्वरनगर येथील सिध्दीविनायक मंदिरा समोरील रेल्वे ट्रॅकवर भुयारी मार्ग उभारण्यसाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून सध्या या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -