घरनवी मुंबईग्रीन सीटीत वायू प्रदूषणाचा धोका वाढला; समस्या गंभीर

ग्रीन सीटीत वायू प्रदूषणाचा धोका वाढला; समस्या गंभीर

Subscribe

दिल्ली, मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता मागील काही महिन्यांपासून घरसल्याची बाब समोर आली असतानाच नवी मुंबईतही वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. स्मार्ट, ग्रीन सीटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहरातील नेरुळ परिसरातील हवेचा दर्जा सतत घसरत जात असल्याने रहिवाशांना आरोग्याची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यात नेरुळ येथे हवेचा दर्जा सर्वात जास्त प्रदूषित आढळला आहे.

नवी मुंबई: दिल्ली, मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता मागील काही महिन्यांपासून घरसल्याची बाब समोर आली असतानाच नवी मुंबईतही वायू प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. स्मार्ट, ग्रीन सीटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या शहरातील नेरुळ परिसरातील हवेचा दर्जा सतत घसरत जात असल्याने रहिवाशांना आरोग्याची चिंता वाढली आहे.
जानेवारी महिन्यात नेरुळ येथे हवेचा दर्जा सर्वात जास्त प्रदूषित आढळला आहे. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी रोजी नेरुळ येथील हवेचा दर्जा सलग ३०० प्रतिक्यूबीक मीटरपेक्षाही जास्त राहिला आहे. नेरुळनजीकच्या उलवे ते पनवेल या पट्ट्यात निर्माणाधीन नवी मुंबई विमानतळामुळे नजीकच्या १५ ते २० किलोमीटर क्षेत्रात इमारतींची बांधकामे २०० ते ३०० पटीने वाढली आहेत. त्याच प्रमाणे जेएनपीटीसह शहरात विविध नागरी विकास कामांसाठी सुरु असणारी बांधकामे यामुळे देखील वाढतील धूळ, डिझेलच्या वाहनांचा धूर, हवामान बदल यामुळे वायू प्रदूषण वाढत असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.
नेरुळ येथील शुश्रुषा हार्ट केअर सेंटर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संजय तारळेकर म्हणाले की, वायू प्रदूषण हे विडी अथवा सिगारेट स्मोकिंगसारखे आहे, ज्याचा फुफ्फुसां आणि हृदयावर थेट परिणाम होतो. प्रदूषणामुळे हृदयाच्या धमन्यांचे नुकसान होते तर हृदयाला रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नियमित व्यायाम व संतुलित आहार घेणे हाच यावर उत्तम उपाय आहे. प्रदूषण टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आतापासूनच करणे काळाची गरज आहे, असे डॉ.तारळेकर यांनी स्पष्ट केले.

नेरुळला यामुळे अधिक धोका
सानपाडा, नेरुळ आणि जुईनगर या रस्त्यावरुन मुख्यत्वे करुन बंगळूर व महाराष्ट्राला जोडणारे महामार्ग आहेत. याच ठिकाणाहून सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा-पुर्ण आणि उरण-जेएनपीटीकडे जाणारा मार्ग आहे. ग्रीट स्पॉट असणार्‍या नेरुळ परिसरात वंडर्सपार्क, रॉक गार्डन, हिरवाईचा पामबीच मार्ग आणि सर्वाधिक उद्याने असली तरी या भागातून मोठया प्रमाणार जाणारी अवजड व डिझेल इंधनांच्या वाहनांमुळे व मागील चारवर्षापासून सुरु असणारे विकास प्रकल्प हवेचा दर्जा खालवण्यास कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे नेरुळवासियांमध्ये आरोग्या विषयक आजारांमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

शहरातील हवेचा दर्जा (१ फेब्रवारीपर्यंत)
कोपरी गाव वाशी- २६ जानेवारी ३१० तर २८ जानेवारीला ३०८ प्रति क्युबीकमीटरम, सानपाडा-२६ व २७ जानेवारीला अनुक्रमे ३१५ आणि ३०८ प्रति क्युबीकमीटरमध्ये नोंदवला गेला. तर नेरुळमध्ये २७ ते १ फेब्रुवारीपर्यंत हवेच्या दर्जाची अनुक्रमे ३३१, ३४२, ३४३, ३६२, ३३१ आणि ३०० प्रति क्युबीकमीटर नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -