घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखोपडी गावात भाजपला भगदाड

खोपडी गावात भाजपला भगदाड

Subscribe

कोल्हे गटाचे लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंच राष्ट्रवादीत दाखल

कोपरगाव : तालुक्यातील खोपडी ग्रामपंचायतीच्या कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजी नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजी वारकर राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला धक्का देत खोपडीमध्ये भाजपला मोठे भगदाड पडल्याचे चित्र आहे.
कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे जिल्हा परिषद जनसुविधा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खोपडीचे भाजप कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच नवले व शिवसेनेचे उपसरपंच वारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे काळे यांनी स्वागत केले. यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते, जिल्हा परिषद सदस्या सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, दिलीप दाणे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार आदी उपस्थित होते.

- Advertisement -

कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला विकासाची परिभाषा लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला असून, सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळालेला आहे. तालुक्यातील नागरिकांना भविष्यातदेखील अशाच विकासाची अपेक्षा आहे. नांदूरमध्यमेश्वर कालव्याच्या प्रकल्पबाधित खोपडी व परिसरातील गावातील शेतकर्‍यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळवून देण्याचा प्रलंबित प्रश्न सुटला आहे. त्यामुळे साहजिकच नागरिकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरचा विश्वास वाढला आहे. त्यामुळे विकासाच्या ज्या अपेक्षा ठेवून खोपडीचे सरपंच, उपसरपंच व कार्यकर्त्यांनी विकासाच्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या विश्वासाला तडा न जाऊ देता विकासासाठी मदत करेन. गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो विकास झाला तोच विकास यापुढेदेखील होईल, अशी ग्वाही आमदार काळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर, गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड, राहुल जगधने, बाळासाहेब जगताप, शिवाजीराव वारकर, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, रामदास वारकर, मनोज जगताप, दामोधर वारकर, पुंजाहरी वारकर, आदिनाथ वारकर, केशवराव वारकर, जालिंदर वारकर, भाऊसाहेब वारकर, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब मच्छिंद्र वारकर, जगन्नाथ नवले, बाबुराव नवले, राजेंद्र दुशिंग, अण्णासाहेब जाधव, सोमनाथ वारकर, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, शाखा अभियंता गुंजाळ, विस्तार अधिकारी डी. ओ. रानमाळ, ग्रामसेवक शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -