घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाच पडली महागात; लाचखोर मंडळ अधिकारी, सहायक गजाआड

लाच पडली महागात; लाचखोर मंडळ अधिकारी, सहायक गजाआड

Subscribe

विक्री केलेल्या जमिनीची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराकडून घेतली ८ हजारांची लाच

तालुक्यातील पोखरी हवेली येथील विक्री केलेल्या जमिनीची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना समनापूरचे मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयातील एका खासगी हस्तकाला सोमवारी (दि.१२) अहमदनगरच्या लाचलुखपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. मंडल अधिकारी बाळासाहेब कचरु जाधव व मनोज ज्ञानेश्वर मंडलिक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथील तरुणाने जमीन आपल्या चुलत्याला विकली. याबाबत कागदोपत्री नोंद करताना त्यात चुकीचे क्षेत्र नमूद झाले होते. त्या आधारावर शेतीची फेरनोंद झाली होता. तक्रारदाराने ही नोंद रद्द करण्यासाठी समनापूर येथील मंडल अधिकारी कार्यालयाकडे अर्ज दिला होता. मंडलाधिकारी जाधव यांच्याकडून खरेदी फेरमंजूर होणे प्रलंबित होते. जाधव यांनी कार्यवाहीसाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचेही ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शहानिशी केली. समनापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयात आठ हजार रुपये स्वीकारताना मंडल अधिकारी बाळासाहेब जाधव आणि त्यांचा खासगी सहाय्यक मनोज मंडलिक या दोघांना पथकाने अटक केले. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -