घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहुंडाबळी : सिन्नरच्या नवविवाहितेचा सासरच्या कुटुंबाने घेतला जीव

हुंडाबळी : सिन्नरच्या नवविवाहितेचा सासरच्या कुटुंबाने घेतला जीव

Subscribe

कोपरगाव पोलिसांनी सासरच्या ६ जणांविरुद्ध दाखल केला गुन्हा, पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मुलीचा गेला बळी

सिन्नर तालुक्यातील माहेर असलेल्या नवविवाहितेचा पतीसह सासरच्या कुटुंबाने पेटवून देत बळी घेतल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे. मुलीचे वडील पांडुरंग रामभाऊ लोंढे यांच्या तक्रारीवरून कोपरगाव पोलिसांनी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मुलीचा बळी गेल्याने सर्वच स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. तसेच, या हत्येला कारणीभूत व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली जाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील लिंग टांगवाडी येथील पांडुरंग रामभाऊ लोंढे यांची मुलगी पूजा हिचा १६ फेब्रुवारी २०२१ रोजी कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील निखिल विलास म्हेत्रे याच्याशी विवाह झाला होता. विवाहाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर नवीन घर घेण्यासाठी सासरच्या व्यक्तींनी पूजाकडे माहेरून २ लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केली. त्यात निखिल म्हात्रे, सासरे विलास निवृत्ती म्हात्रे, सासू लता म्हात्रे, दिर आशिष म्हात्रे, दिर स्वप्नील म्हात्रे, जाऊ रेखा स्वप्नील म्हात्रे या सर्वांचा सहभाग होता. पैशांसाठी पतीसह सासू, सासऱ्यांनी मारहाण व शिवीगाळ सुरू केल्याचे पूजाने वडिलांना सांगितले. वडील पांडुरंग लोंढे यांनी वेळोवेळी मुलीच्या सासरी जाऊन त्यांची समजून घातली. मनधरणी केली. पूजानेही माहेरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत पैसे देता येणार नसल्याचे सांगितले. अखेर, २६ जुलै २०२१ रोजी पूजाच्या मोबाईलवरुन तिच्या दिराने फोन करुन पूजाच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ती भाजल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मात्र जेव्हा पूजाचे वडील रुग्णालयात गेले तेव्हा पूजाला पेटवून दिल्याने भाजून ती जखमी झाल्याचे निदर्शनास आले. मृत्यूशी दोन हात देताना पूजाची झुंज अखेर २८ जुलै २०२१ रोजी संपली. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यातून संताप व्यक्त केला जातो आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -