घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंगमनेरचे रस्ते खड्ड्यांत, आंबी फाट्यावर ग्रामस्थांचं रास्ता रोको

संगमनेरचे रस्ते खड्ड्यांत, आंबी फाट्यावर ग्रामस्थांचं रास्ता रोको

Subscribe

आंदोलनामुळे हायवेच्या दुतर्फा वाहनांच्या लांबवर रांगा

संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी ते बोटा या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ लागले आहेत. मृत्यूचा सापळा बनू पाहणारे हे रस्ते त्वरित दुरुस्त करून खड्डे बुजवण्यात यावेत, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी आंबीफाटा येथे सोमवारी (दि.२७) सकाळी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.

कुरकुटवाडी, आंबीदुमाला, म्हसवंडी या भागातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, मालवाहतूक वाहने याच रस्ताने बोटा याठिकाणी येत असतात. तसेच हा रस्ता दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे. परंतु रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना अनेक छोट्या -मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे म्हणून या संदर्भात अनेक वेळा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले शेवटी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी आंबीफाटा येथे ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. तर या ठिय्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, माजी सरपंच अरुण कुरकुटे, खंडू जाधव आदी सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले. मात्र, ते उपस्थित नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. शेवटी घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, किशोर लाड, संतोष फड उपस्थित होते.

या आंदोलनासाठी युवा नेते रामा कुरकुटे, सार्थक कुरकुटे ,सुजित कुरकुटे, विठ्ठल कुरकुटे, सिद्धार्थ कुरकुटे, लीलाधर कुरकुटे ,तुषार कुरकुटे, पांडू कुरकुटे या तरुणांनी पुढाकार घेतला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -