घरपालघरजव्हार तालुक्यातील २३९ शाळा होणार धूरमुक्त; गॅस जोडणीसाठी निधी उपलब्ध

जव्हार तालुक्यातील २३९ शाळा होणार धूरमुक्त; गॅस जोडणीसाठी निधी उपलब्ध

Subscribe

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. यासाठी प्रत्येक शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी चुलीचा वापर केला जात होता.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पात्र शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. यासाठी प्रत्येक शाळेत पोषण आहार शिजविण्यासाठी चुलीचा वापर केला जात होता. शाळेजवळच आहार शिजविला जात असल्याने चुलीतील धूर वर्गात पसरत आहे. याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे शासनाने शाळा धूरमुक्त करण्यासाठी शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तालुक्यातील २३९ शाळा शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र झाल्या आहेत. शालेय पोषण आहार कोरोना काळात विद्यार्थ्यांना कोरड्या स्वरूपात मिळत होता. परंतु आता जनजीवन सुरळीत झाल्यानुसार शाळा देखील नियमितपणे सुरू झाल्या आहेत. त्यातच तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका व खासगी अनुदानित २३९ शाळांत गॅस जोडणीसाठी पंचायत समिती जव्हार येथिल शिक्षण विभागाने प्रत्येकी ४०९० एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून गॅस जोडणी घेतली जाणार असून तालुक्यातील शाळा या लवकरच शाळा धूरमुक्त होणार आहेत.

जव्हार तालुक्यातील शालेय पोषण आहार पात्र शाळांमध्ये गॅस जोडणीसाठी शासनाने प्रत्येक शाळेसाठी ४०९० रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गॅस जोडणी घेण्याच्या सूचनाही मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.
– पुंडलिक चौधरी, प्रभारी, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, जव्हार

- Advertisement -

या शाळांना गॅस जोडणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिक्षण संचालक कार्यालयाकडून शाळांच्या बँक खात्यावर हा निधी ऑनलाइन वितरित झाला आहे. शासन निर्णयातील निर्देशानुसार तालुक्यातील भारत गॅस एजन्सीकडून शालेय व्यवस्थापन समितीने गॅस जोडणी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एलपीजी गॅस जोडणीसाठी प्रत्येक पात्र शाळांना ४०९० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी शाळेच्या बँक खात्यावर जमाही करण्यात आला आहे. शाळांनी एकाच एजन्सीकडून कनेक्शन करून घ्यावे लागणार आहे.

हेही वाचा – 

राज ठाकरे यांची अनपेक्षित माघार, महाआरत्या केल्या रद्द, भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -