घरपालघरअनाथ मुलीवर बलात्कार प्रकरणी काकावर गुन्हा दाखल

अनाथ मुलीवर बलात्कार प्रकरणी काकावर गुन्हा दाखल

Subscribe

या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

भाईंदर :- काशीगाव पोलीस ठाण्याचा हद्दीतील एका अनाथ मुलीला तिच्या मावशीच्या पतीने पालन पोषण करून तिला वाढविले आणि त्याच अल्पवयीन पीडित मुलींवर लैंगिक अत्याचार करत बलात्कार केल्याचा प्रकार काशिगाव परिसरात उघडकीस आला होता.त्यानंतर मावशीच्या पतीविरोधात काशीगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०२१ पासून १ मार्च २०२४ पर्यंत अल्पवयीन पीडित मुलीचा मावसा व आरोपी शंकर नाथ याने पीडितेवर तिच्या एकटेपणाचा असहाय्यतेचा आणि अनाथ असल्याचा फायदा घेवून पीडितेला धमकावून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानुसार सदरील तक्रार काशीगाव पोलीस ठाण्यात वर्ग होऊन त्यावरून आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३७६(२) (एफ), ५०६ सह लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा, २०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरील गुन्ह्याचा तपास काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मनोरे हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -