घरपालघरमजुरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Subscribe

त्यानंतर मजुरांनी लगेच ते काम सुरू करून पटरी व्यवस्थित केल्याचे सांगितले जात आहे. बाजूच्या पटरीवर काम करणार्‍या मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगितले जात आहे.

भाईंदर :- मीरारोड रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ वाकले होते .परंतु बाजूच्या पटरीवर काम करणार्‍या मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे सांगितले जात आहे. मीरारोड स्थानकावरून चारच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर एक एक्सप्रेस गेली. त्यावेळी रेल्वे मजुरांना एक्सप्रेसचे डब्बे हलताना दिसले. त्यानंतर रेल्वे कामगार पाहण्यासाठी गेले असता रेल्वे पटरीला बेंड झाल्याचे आढळून आले. ट्रॅकमधील दगड कमी झाल्याने ट्रॅक वाकडी झाली असल्याचा प्राथमिक माहिती रेल्वे कामगारांनी पोलिसांना दिल्यानंतर, आरपीएफचे जवान व रेल्वे अधिकारी स्थानकांवर आले. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल ट्रेन थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना ट्रेनमधून उतरवून ट्रेन खाली करून हळूहळू ट्रेन ट्रॅकवरून पुढे घेण्यात आली. त्यानंतर मजुरांनी लगेच ते काम सुरू करून पटरी व्यवस्थित केल्याचे सांगितले जात आहे. बाजूच्या पटरीवर काम करणार्‍या मजुरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -