घरठाणेक्लस्टरसाठी मुंब्र्यात सर्वेक्षण सुरू

क्लस्टरसाठी मुंब्र्यात सर्वेक्षण सुरू

Subscribe

ठाणे । समूह विकास (क्लस्टर) योजनेसाठी मुंब्र्यात सर्वेक्षण सुरु झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक राजन किणे यांनी दिली. या योजने अंतर्गत अनधिकृत घरांमध्ये राहणार्‍या नागरिकांना 325 चौरस फुटाची अधिकृत घरे मिळणार आहेत. ही योजना मुंब्र्यात कार्यान्वित करण्यात यावी. यासाठी 2014 च्या महासभेत प्रस्ताव माडला होता. तेव्हापासून या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे ही योजना मूर्त स्वरुपात आली. 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर शहरातील एका नेत्याने या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप किणे यांनी कुणाचेही नाव न घेता केला. मुंब्र्यात ही योजना दोन चरणात राबविण्यात येणार आहे. पहिल्या चरणात आयशा मस्जिद ते नारायण नगर या दरम्याच्या परिसरातील घरांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पहिले चरण पूर्ण झाल्यानंतर दुसर्‍या चरणातील संजय नगर, ठाकुरपाडा येथील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणार्‍यांना सहकार्य करुन त्यांना घराची आणि कुटुंबाची अचूक माहिती द्यावी. सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्यास ठामापाशी संपर्क साधावा, घराची कागदपत्रे दाखवून ती पुन्हा ताब्यात घ्यावीत, असे आवाहन किणे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -