घरपालघरनायजेरियनच्या अनधिकृत बारवर छापेमारी

नायजेरियनच्या अनधिकृत बारवर छापेमारी

Subscribe

असे असतानाही प्रगतीनगरमधील नायजेरियन नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे.

वसईः नायजेरियन नागरिकांच्या बेकायदा बारवर तुळींज पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी एकोणीस नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. तपासात यातील पाच नायजेरियन बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करत असल्याचे उजेडात आले आहे. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये नायजेरियन नागरिकांची मोठी वस्ती आहे. अंमली पदार्थासह देहव्यापारात नायजेरियन गुंतल्याचे पोलिसांच्या कारवाईत अनेकदा दिसून आले आहे. असे असतानाही प्रगतीनगरमधील नायजेरियन नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे.

शुक्रवारी रात्री तुळींज पोलिसांनी प्रगतीनगरमधील नूर अपार्टमेंटमधील तीन फ्लॅटमध्ये अनेक नाजयेरियन पुरुष आणि महिला अश्लिल गाणी लावून, तोकड्या कपड्यात अश्लिल नाचगाणी करताना आढळून आली. तसेच यावेळी साठ हजार रुपयांचा बेकायदा दारुचा साठाही आढळून आला. या छाप्यात पोलिसांनी एकोणीस नायजेरियनना ताब्यात घेतले. चौकशीत यातील पाच जणांकडे पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे आढळून आले. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याआधीही पोलिसांनी या परिसरात नायजेरियन नागरिकांकडून चालवल्या जाणार्‍या बेकायदा बारवर कारवाई केली होती.

- Advertisement -

रुममालक आणि दलाल माहिती लपवतात

नायजेरियन परकीय नागरिकांना रुम भाड्याने दिल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे निर्देश दिले आहेत. पण, जादा भाड्याच्या लालसेपोटी रुममालक आणि दलाल ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवत आहेत.तसेच बेकायदेशीरपणे वास्तव्य करण्यास परदेशी नागरिकांना सोपे जात असल्याचे पुन्हा एकदा या धाडीतून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी रुममालक आणि दलालांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -