घरपालघरदरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

दरोडेखोरांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Subscribe

अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या परवानगीने याटोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.

वसईः महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थान परिसरात खून, खूनासह दरोडा, शस्त्र दरोडा, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, चोरी असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या आंतरराज्य टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवरील पेट्रोल पंप लुटण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अटक केली होती. यावेळी टोळीचा म्होरक्या मनीष उर्फ राजू मोहन चव्हाण (रा. वैजापूर, जि. औरंगाबाद(, भाऊसाहेब शंकर गवळी (रा. ता. नेवासा, जि. अहमदनगर), रविंद्रसिंग सुखराम सोलंकी (रा. गुणा, मध्यप्रदेश), सुखचेन रेवत पवार (रा. गुणा, मध्यप्रदेश), माँटी नंदू चौहान (रा. गुणा, मध्यप्रदेश) यांच्यास त्यांची महिला साथिदार दरोडेखोर अश्विनी रुपचंद चव्हाण (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली होती.

पोलीस तपासात या टोळीने महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, पुणे, सांगली, अहमदनगर, औरंगाबाद सह मध्यप्रदेश आणि राज्यस्थान राज्यात खून, खूनासह दरोडा, सशस्त्र दरोडा, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घऱफोडी, चोरी असे अनेक गुन्हे केल्याचे उजेडात आले होते. सुखचेन रेवत पवार आणि रविंद्रसिंग सुखराम सोलंकी दोघे सराईत दरोडेखोर असून २०१८ पासून मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्यावर पोलिसांनी बक्षिसही लावले होते. ही टोळी अत्यंत खतरनाक असून दरोडे घालताना प्रतिकार केला तर थेट प्राणघातक हल्ला करून हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल जात होती. २०१९ मध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील हॉटेल व्यावसायिक सुरेश मुनाजे यांच्या बंगलात टोळीने दरोडा टाकला होता. त्यावेळी दरोडेखोरांनी सुरेश मुनाजे यांची हत्या केली होती. या प्रकरणात राजू चव्हाणला अटक झाल्यानंतर सप्टेंबर २०२३ रोजी जामिनावर सुटला होता. त्यानंतरही त्याने टोळी सक्रीय करून पुन्हा दरोडे टाकण्यास सुरुवात केली होती. २०२३ च्या सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात या टोळीने पाच दरोडे घातले होते. गुन्हे शाखा तीनने अटक केल्यानंतर आतापर्यंत सात गुन्हयांची उकल झाली आहे. या टोळीने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने याटोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई सुरु केली होती. अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या परवानगीने याटोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -