घरपालघरडहाणूतील अतिक्रमणावरील कारवाईविरोधात सर्वपक्षीय एकवटले

डहाणूतील अतिक्रमणावरील कारवाईविरोधात सर्वपक्षीय एकवटले

Subscribe

कोर्टाच्या निर्देशानुसार डहाणू नगरपरिषदेने सरकारी जागेवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.

डहाणू : डहाणू नगरपरिषदेने आपल्या हद्दीतील अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी संबंधितांना नोटीसा बजावल्या आहेत. त्याला डहाणूतील सर्वपक्षीयांनी विरोध केला आहे. माकप आणि राष्ट्रवादी या कारवाईला विरोध करण्यासाठी येत्या ३१ मार्चला मोर्चा काढणार आहे. तर भाजपनेही कारवाईला विरोध केला आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार डहाणू नगरपरिषदेने सरकारी जागेवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.

नगरपरिषदेने शिवाजीनगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई केली आहे. आता उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला डहाणूतील राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. माकपचे आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाईला विरोध करण्यासाठी ३१ मार्चला नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
दरम्यान, नगरपरिषदेत भाजपची सत्ता असून भाजपकडूनही या कारवाईला विरोध करण्यात आला आहे. नगराध्यक्ष भरत रजपूत यांनी मुख्याधिकार्‍यांची भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे. अतिक्रमणाबाबत लवकरच पालकमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यामुळे कारवाई तात्पुरती थांबवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -