घरपालघरपालघर जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीला सर्व पक्षीय आमदारांचा बहिष्कार

पालघर जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीला सर्व पक्षीय आमदारांचा बहिष्कार

Subscribe

धानिवरी येथील कब्जेदार शेतकर्‍यांना घराचा मोबदला, आपल्या उदरनिर्वाहसाठी लावलेल्या झाडांचा मोबदला देण्यात यावा तसेच धानिवरी येथे अमानुषपणे आदिवासी कुटुंबियांना घराबाहेर काढले

पालघर: पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूसंपादन या विषयी बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीच्या आधी जोपर्यंत धानिवरी येथील विषय निकाली येत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला बसणार नाही, असा पवित्रा सर्व पक्षीय आमदारांनी घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा, शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले व माजी खासदार बळीराम जाधव उपस्थित होते.

धानिवरी येथील कब्जेदार शेतकर्‍यांना घराचा मोबदला, आपल्या उदरनिर्वाहसाठी लावलेल्या झाडांचा मोबदला देण्यात यावा तसेच धानिवरी येथे अमानुषपणे आदिवासी कुटुंबियांना घराबाहेर काढले त्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबन करावे व भूसंपादन केलेल्या जागेचा मोबदला मिळावा अशा आमच्या मागणी आहेत. या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला दुसर्‍या कोणत्याही बैठकीत बसण्यात कोणताही रस नाही. अशी आमची भूमिका आहे, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान सर्व पक्षीय आमदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍यांवर बसून जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, प्रशासन की दादागिरी नहीं चलेगी, पोलीस की दादागिरी नहीं चलेगी अश्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी धानिवरी गावातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

यावेळी पत्रकारांनी चारही आमदारांना प्रश्न विचारला की लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही आहे का..? या प्रश्नावर उत्तर देताना विनोद निकोले आणि सुनिल भुसारा यांनी सांगितले की, अहो मंत्र्यांचे अधिकारी ऐकत नाहीत, आम्ही तर आमदार आहोत, असे उत्तर आमदारांनी पत्रकारांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -