घरपालघरबोईसरमधील खासगी कार्यालयावर सशस्त्र दरोडा

बोईसरमधील खासगी कार्यालयावर सशस्त्र दरोडा

Subscribe

अंगठी असा ऐवज लुटून चोरांनी पोबारा केला. त्यानंतर दोरीने हात बांधून ठेवलेल्या तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेऊन मालकाला फोनवरून घडलेली हकीकत सांगितली.

बोईसर : बोईसर मधील खासगी कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. आज शुक्रवार दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास ओसवाल परिसरातील राजश्री इंटरप्रायजेस या खासगी कार्यालयात घुसलेल्या ५ चोरांनी काम करणार्‍या कर्मचार्‍यांना रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक धाकवत रोख रक्कम आणि अंगावरील सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला आहे. बोईसरच्या ओसवाल एम्पायरसारख्या उच्चभ्रू आणि गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे खळबळ माजली आहे. बोईसरच्या ओसवाल एम्पायरच्या रिषभ अपार्टमेंटमधील राजश्री इंटरप्राईजेस या खासगी कार्यालयावर दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. कार्यालयात काम करणारी एक महिला आणि तरुण यांना रिव्हॉल्वर आणि चाकूचा धाक दाखवत तसेच त्यांना दोराने खुर्चीला बांधून कार्यालयातील साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि चहा घेऊन आलेल्या माणसाच्या हातातील अंगठी असा ऐवज लुटून चोरांनी पोबारा केला. त्यानंतर दोरीने हात बांधून ठेवलेल्या तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेऊन मालकाला फोनवरून घडलेली हकीकत सांगितली.

बोईसर पोलिसांनी या सशस्त्र दरोड्याचा तपास सुरू केला असून पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट आणि उपअधीक्षक शैलेश काळे यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांना तपासाबाबत सूचना दिल्या.यानंतर पोलिसांनी बोईसर आणि तारापूर औद्योगिक परिसरात सर्वत्र नाकेबंदी करीत दरेडोखोरांचा शोध सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -