घरमहाराष्ट्रकंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कंटेनर अंगणवाडी उपयुक्त संकल्पना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा,कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच अंगणवाडी दत्तक योजनेतंर्गत महिला व बाल विकास विभागाने भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणा-या इतर सामाजिक संस्था यांच्यासोबत सामांजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या.  एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात तीस लक्ष वृक्ष लागवडीच्या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.

मुंबईः जागेची टंचाई असलेल्या मुंबईत कंटेनर अंगणवाड्या ही उपयुक्त संकल्पना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असून बालक आणि पालकांसाठी ही अंगणवाडी निश्चितच सहायक ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कंटेनर अंगणवाडी उपक्रमांतर्गत जानुपाडा,कांदिवली, पूर्व येथील कंटेनर अंगणवाडीचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. तसेच अंगणवाडी दत्तक योजनेतंर्गत महिला व बाल विकास विभागाने भव्यता फाऊंडेशन आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणा-या इतर सामाजिक संस्था यांच्यासोबत सामांजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या.  एचडीएफसी बॅंक आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात तीस लक्ष वृक्ष लागवडीच्या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कंटेनर अंगणवाडी प्रमाणेच विभागामार्फत अंगणवाड्या दत्तक योजनेतंर्गत सुविधायुक्त अंगणवाड्या उपलब्ध होत आहेत. बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही उत्तम सुविधा आहे. यात अंगणवाडी सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे यावेळी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसारख्या ठिकाणी कंटेनर अंगणवाडी ही सुविधा माता, बालकांसाठी वरदान ठरेल. बालकांच्या पोषण-संगोपनात अंगणवाडीचे महत्व लक्षात घेऊन शासनाला राज्यभरातील सर्व अंगणवाड्या दर्जेदार करायच्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगणवाड्यांकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. अंगणवाडी दत्तक योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांची गुणवत्ता आणि सुविधा वृद्धिंगत करता येतील. भावी पिढी सुदृढ होण्यासाठी अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वाची असून महिला व बालकांच्या विकासासाठी विभाग सक्रियपणे काम करत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील अंगणवाडी केंदांच्या बळकटीकरणाकरिता सीएसआर, सामाजिक संस्था, यांच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांना शैक्षिणिक सुविधा, वृध्दी संनियंत्रण साहित्य वाटप, प्रशिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य तपासणी करिता सहाय्य इत्यादी बाबींचा अंगणवाडी दत्तक योजनेत समावेश आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यात एकूण ३६५६ अंगणवाडी केंद्र विविध कंपन्या, सामाजिक संस्था यांनी ऑक्टोबर २०२२ पासून आजपर्यंत दत्तक घेतलेल्या आहेत. भव्यता फाऊंडेशन यांनी यापूर्वी ५ अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली असून आज एकूण ४० अंगणवाडी केंद्र दत्तक घेतली आहेत. यामध्ये नाशिक-५, पालघर -५, गडचिरोली-९, चंद्रपूर-१, धुळे-१, नंदूरबार- १, औरंगाबाद- १५, रायगड-२, रत्नागिरी-१ यांचा समावेश आहे.

मुंबईमधील अंगणवाडी केंद्र प्रामुख्याने झोपडपट्टी क्षेत्रातील रहिवाश्यांच्या घरात भाडयाने चालविण्यात येतात. घरांचे क्षेत्रफळ छोटे असल्याने कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याची संकल्पना माहिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मांडलेली आहे. कंटेनर अंगणवाडी ठेवण्याकरिता २४९ रिकाम्या जागा शोधण्यात आलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -