घरपालघरसावर्डे येथील वैतरणा नदीवरील पूलाचे काम पूर्ण

सावर्डे येथील वैतरणा नदीवरील पूलाचे काम पूर्ण

Subscribe

अवघ्या तीन महिन्यांत वैतरणा नदीवर पूल उभारून नागरिकांना समस्येतून मुक्त करत सावर्डेकरांना मुख्य प्रवाहात आणण्यास पुलामुळे मदत होणार आहे.

अवघ्या तीन महिन्यांत वैतरणा नदीवर पूल उभारून नागरिकांना समस्येतून मुक्त करत सावर्डेकरांना मुख्य प्रवाहात आणण्यास पुलामुळे मदत होणार आहे. बरोबर तीन महिन्यांपूर्वी वृत्तपत्रांतून लाकडी ओंडक्यावरून जीवघेणा प्रवास केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच प्रशासन अॅक्शन मोडवर येऊन वैतरणा नदीवर पुलाचे काम मार्गी लागले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील आदिवासींना रोजगार, बाजारहाट, दवाखाना, नातेवाईकांना भेटण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वैतरणा नदीपात्रावर लाकडी ओंडक्यावरून पायपीट करत जीवघेणा प्रवास करावा लागत होता.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे हे भीषण वास्तव वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. सावर्डे येथील नागरिकांना लाकडी ओंडक्यावरून पायपीट करावी लागत असल्याने या घटनेची दखल पर्यावरण व पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली होती. मोखाड्यातील अतिदुर्गम सावर्डे गावासह परिसरातील गावांच्या आदिवासी नागरिक व विद्यार्थ्यांना वैतरणा नदीपात्रावरील लाकडाच्या ओंडक्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता. अखेर प्रशासनाने दखल घेत येथे तातडीने पुल बांधण्याचे आदेश संबंधितांना दिले. त्याची अंमलबजावणी सुरू होऊन येथे आता लोखंडी पुल बांधण्यात आला असून त्यामुळे येथील आदिवासी मुख्य प्रवाहात येणार आहे.

- Advertisement -

सावर्डेकारांच्या समस्येची दखल दोन्ही मंत्र्यांनी घेऊन त्यांच्या निर्देशानुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी तातडीने दुसऱ्याच दिवशी १ फेब्रुवारीला येथे लोखंडी पुल बांधण्यासाठी डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत १५ लाखाचा निधी ऊपलब्ध करून देत निविदा, सुचना प्रसिद्ध केली होती. या कामाचे कंत्राट सरकार एंटरप्रायझेस या कंत्राटदाराने घेऊन पुलाचे काम वेगाने केले. जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत, दिवसरात्र या पुलाचे काम क्रेनच्या सहाय्याने लोखंडी गल्डर टाकण्यात आला. या कामावर वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेतील सदस्य प्रकाश निकम आणि पदाधिकारी यांनी लक्ष घालून वैतरणा नदीपात्रावरीवरील लोखंडी पुलाच्या जोखमीचे काम पूर्ण होऊन केले.

हेही वाचा – 

राज ठाकरे यांची अनपेक्षित माघार, महाआरत्या केल्या रद्द, भोंग्याबाबत भूमिका स्पष्ट करणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -