सरकारी कार्यालयांना दलालांचा विळखा

याप्रकल्पांसाठी बाराशे हेक्टरपैकी ७५० हेक्टर जमिनीचा मोबदला वाटप झाला असून साधारण २७५ हेक्टर जमिनीचा मोबदला देणे अद्यापही बाकी आहे

वसईः आमदार विनोद निकोले यांनी मांडलेल्या मुद्द्यात वस्तुस्थिती आहे. आदिवासी बांधवांचा अज्ञानाचा फायदा घेऊन दलाल फसवणूक करत आहेत. त्याकरता सामान्य शेतकऱ्यांना आपल्या शेती जमिनीची सर्व दस्तावेज मिळावे म्हणून आम्ही विशेष मोहीम प्रांत अधिकाऱ्यांच्या स्थारावरूनच शेतकऱ्यांशी थेट संवाद सांधून मोबदला देणार आहोत, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार विनोद निकोले यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना दिली.मुंबई – बडोदा सुपर फास्ट हायवे, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, डेडिकेटेड रेल्वे फ्रेट कॉरिडोर आदी केंद्राचे प्रकल्प पालघर जिल्ह्यातून जात आहेत. याप्रकल्पांसाठी बाराशे हेक्टरपैकी ७५० हेक्टर जमिनीचा मोबदला वाटप झाला असून साधारण २७५ हेक्टर जमिनीचा मोबदला देणे अद्यापही बाकी आहे, अशी माहिती देताना मंत्री विखे-पाटील यांनी दलालांचा विळखा या भागामध्ये आहे, अशी यांनी स्पष्ट कबुली दिली.

दापचरीमध्ये मुंबईतील तबेले आणून येथे स्वतंत्र दुग्ध प्रकल्प करा असा निर्णय शासनाचा झाला होता. त्यावेळी सहा हजार एकर जमीन भूसंपादित करण्यात आली होती. यात एक स्वतंत्र धरण बांधण्यात आले. परंतु, दुर्दैवाने त्या जागेचा वापर कधी झाला नाही. त्यात अतिक्रमणे झाली. अहमदाबाद हायवे गेला. आता बुलेट ट्रेन तेथून जाणार आहे. त्यातील ज्या शेतकऱ्यांची जमीन दापचेरी येथून भूसंपादित केली गेली होती. शंभर एकर जमीन घेतली असेल त्यांना दोन एकर जागा दिली आहे. त्यातूनच आता हायवे जात आहे. पण, त्यांना भरपाईमधून वगळले जात आहे, याकडे निकोले याकडे आमदार निकोले यांनी लक्ष वेधले होते. त्या शेतकऱ्यांना देखील त्यात सामावून घेतले जाईल आणि त्यांना देखील भरपाई देण्यात येईल, अशी माहिती मंत्री विखे-पाटील यांनी दिली.

मुंबई – बडोदा सुपर फास्ट हायवे, मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, डेडिकेटेड रेल्वे फ्रेट कॉरिडोर आदी केंद्राचे प्रकल्प पालघर जिल्ह्यातून जात आहेत. याप्रकल्पांमध्ये ज्याकाही जागा संपादित केल्या जात आहेत, त्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असून त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. शेतकऱ्यांची जमीन संपादित झाली आहे पण, लाभ त्यांना मिळालेला नाही, याकडेही आमदार निकोले यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.