घरपालघरअनधिकृत बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

अनधिकृत बांधकामप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

Subscribe

सदर जखमींना तात्काळ कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटल बंगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत दोन रिक्षांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.

वसईः वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती एच’ कार्यक्षेत्रात येत असलेल्या माणिकपूर येथील अनधिकृत बांधकामाचा सजा रिक्षाच्या टपावर पडून रिक्षातील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. भर रस्त्यालगत असलेल्या सदर अनधिकृत बांधकामाला अप्रत्यक्ष संरक्षण देणार्‍या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी वसई रोड शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांनी केली आहे.

प्रभाग समिती एच’ कार्यक्षेत्रातील माणिकपूर येथील माणिकपूर अर्बन बँकेच्या समोर असलेल्या रिक्षा स्टॅण्डजवळ मुख्य रस्त्याला लागून दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम मागील काही महिन्यांपासून सुरू होते. मात्र, भर रस्त्यालगत सुरू असलेल्या सदर अनधिकृत बांधकामाकडे वसई-विरार महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू होते. २० मार्चला दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास सदर अनधिकृत बांधकामाचा सजा रिक्षा स्टॅण्डवर उभ्या असलेल्या रिक्षांवर कोसळला. त्यामुळे रिक्षात बसलेले दोन प्रवासी जखमी झाले. सदर जखमींना तात्काळ कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटल बंगली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत दोन रिक्षांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. वसई-विरार परिसरात राजरोसपणे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करून त्यांना संरक्षण देणाऱ्या उपायुक्त अजित मुठे यांना सदर गंभीर अपघाताबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सरवणकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -