घरपालघरवाड्यात पेंढ्याच्या दोन हजार गठड्या जळून खाक

वाड्यात पेंढ्याच्या दोन हजार गठड्या जळून खाक

Subscribe

बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करून सुमारे दोन हजार गठड्या जळून खाक झाल्या. या आगीत शेतकर्‍यांचे पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाले

वाडा: तालुक्यातील गुहीर गावातील शेतकरी किसन जाधव यांच्या पेंढ्याच्या गंजीला विद्युत रोहित्राला स्पार्क होऊन लागलेल्या आगीत सुमारे दोन हजार पेंढाच्या गठड्या जळून खाक झाल्याची घटना आज(बुधवारी) दुपारच्या सुमारास घडली.या आगीत शेतकर्‍यांचे सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागली असल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍याने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गुहीर येथील शेतकरी किसन जाधव यांचा पेंढा व गवतापासून गठड्या बनवण्याचा व्यवसाय आहे.या जागेशेजारीच महावितरणचे रोहीत्र असून ते उघड्या अवस्थेत आहे. आज दुपारच्या सुमारास रोहित्र मध्ये स्पार्क होऊन ठिणग्या पडल्या याची आग गंजीला लागली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करून सुमारे दोन हजार गठड्या जळून खाक झाल्या. या आगीत शेतकर्‍यांचे पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाले असे सांगत महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याने महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी किसन जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -