घरपालघरकर्करोग रुग्णालयाचे काम लांबणीवर

कर्करोग रुग्णालयाचे काम लांबणीवर

Subscribe

त्यामुळे हे काम लांबणीवर पडणार आहे. तसेच यापूर्वी सुद्धा मीरारोड येथीलच एस.के. स्टोन येथील महापालिकेचे मुख्यालय भूमिपूजन वादाच्या भोवर्‍यात सापडून वादग्रस्त ठरले आहे.

भाईंदर :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच भूमीपूजन करण्यात आलेले मीरारोड येथील महापालिकेचे नियोजित कर्करोग रुग्णालयाचे काम लांबणीवर पडले आहे. सदरील रुग्णालय बांधण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया देखील सुरु केली होती. परंतु, कर्करोग रुग्णालयासाठी हाय रेडिएशन असलेली टाकी बांधण्यासाठी व आवश्यक असलेल्या इतर सुविधांचा रुग्णालयाच्या बांधकाम आराखड्यात समावेश नसल्यामुळे रुग्णालयाचे आराखडे नव्याने तयार करावे लागणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. त्यामुळे हे काम लांबणीवर पडणार आहे. तसेच यापूर्वी सुद्धा मीरारोड येथीलच एस.के. स्टोन येथील महापालिकेचे मुख्यालय भूमिपूजन वादाच्या भोवर्‍यात सापडून वादग्रस्त ठरले आहे.

कर्करोग रुग्णालय उभारणीसाठी महापालिकेला नव्याने आराखडे तयार करावे लागणार आहेत. हे रुग्णालय नागपूर येथील कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर आता उभारले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण प्रक्रियेला काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णालय बांधणीचे काम लांबणीवर पडणार आहे.मीरा- भाईंदर महापालिकेचे कर्करोग रुग्णालय बांधण्यासाठी नागपूर येथील कर्करोग रुग्णालयासाठी नेमलेल्या मे. हितेन सेठी अँड असोसिएट्स याच सल्लागाराची महापालिकेने नेमणूक केली आहे. सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे पुन्हा आराखडे तयार करण्यात येणार आहेत . त्याला राज्य सरकारची सुधारित मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रसिध्द करून कामाला सुरुवात केली जाणार आहे,अशी माहिती पालिकेचे शहर अभियंता दिपक खांबित यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -