घरपालघरखासदार अरविंद सावंताकडून सामाजिक बांधिलकीची दिवाळी

खासदार अरविंद सावंताकडून सामाजिक बांधिलकीची दिवाळी

Subscribe

या वर्षीही त्याच उत्सव आनंदात सायदे येथील समाज मंदिर हॉलमध्ये फराळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिला माता व बालकांची मोठी उपस्थिती होती.

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील सायदे वाघ्याचीवाडी येथे जाणीव प्रतिष्ठान आयोजित आदिवासीयांसोबत दिवाळी कार्यक्रमात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते डॉ. अरविंद सावंत यांच्या हस्ते ४०० कुटुंबीयांना चकली, लाडू, करंजी, चिवडा असे गोड पदार्थ देऊन आदिवासी बांधवांसोबत मोठ्या उत्सवात दिवाळी साजरी करण्यात आली.
जाणीव प्रतिष्ठान आदिवासी सोबत दिवाळी हा कार्यक्रम अरविंद सावंत हे मागील ३५ वर्षापासून तालुक्यातील खेड्यापाड्यातील वस्तीवर मोठ्या उत्सवाने साजरा करत असतात. या वर्षीही त्याच उत्सव आनंदात सायदे येथील समाज मंदिर हॉलमध्ये फराळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महिला माता व बालकांची मोठी उपस्थिती होती.

उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना गटाचे तालुका अध्यक्ष दिलीप मोहंडकर यांनी बोलताना, शिवसेना फक्त मतदानासाठीच लोकांपर्यंत जात नाही, तर गोरगरीब आदिवासी माय- माऊली जनतेच्या दिवाळीमध्ये सुद्धा सामील होऊन फराळ वाटप करतात. त्यांची दिवाळी गोड करतात. तर डॉ. सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गेल्या ३५ वर्षांपासून हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि जोपर्यंत डॉ. अरविंद आहेत तोपर्यंत करणारच असा शब्द ही दिला. या कार्यक्रमात उपनेत्या ज्योती ठाकरे, तालुका संघटक दिलीप बांडे, शहर प्रमुख ऋषिकेश लोखंडे, युवानेते जयेश जाधव तसेच सायदा ग्रामपंचायतीचे नव लोकनिवृत्त सरपंच सिंधू झुगरे, सदस्या सविता झुगरे, समाजसेवक आत्या झुगरे, ज्येष्ठ नेते देवराम कामडी आणि लहान थोर मंडळीनेही उपस्थिती दर्शवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -