घरपालघरऑनलाईन फसवणुकीतील लाखो रुपये मिळवण्यात यश

ऑनलाईन फसवणुकीतील लाखो रुपये मिळवण्यात यश

Subscribe

त्यानंतर कोर्टात पाठपुरावा करून गुप्ता यांना फसवणूक झालेले ११ लाख १४ हजार २५० रुपये परत मिळवून दिले.

वसईः ऑनलाईन अ‍ॅपवरील आमिषाला बळी पडून ११ लाख १४ हजार २५० रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्या तक्रारदाराला संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात मीरा -भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांना यश मिळाले आहे.वालीव पोलीस ठाण्याच्या दद्दीतील गुप्ता नामक इसमाला टेलिग्राम अ‍ॅपवर गुंतवणूक करून दुप्पट रक्कम मिळेल, असा मेसेज आला होता. त्याला बळी पडून गुप्ता यांनी ११ लाख १४ हजार २५० रुपयांची ऑनलाईन गुंतवणूक केली होती. पैसे दिल्यानंतर काही दिवसांतच फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर गुप्ता यांनी वालीव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी सायबर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. पोलिसांनी व्यवहाराची माहिती घेऊन संबंधित बँकांशी संपर्क साधून गुप्ता यांनी दिलेली रक्कम गोठवण्यात यश मिळवले. त्यानंतर कोर्टात पाठपुरावा करून गुप्ता यांना फसवणूक झालेले ११ लाख १४ हजार २५० रुपये परत मिळवून दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -