घरपालघरइंग्रजी माध्यमाची शाळा अद्यापही बंद; आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

इंग्रजी माध्यमाची शाळा अद्यापही बंद; आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

Subscribe

राज्य सरकारच्या निर्देशानुसार शाळा सुरू होवून महिना उलटला तरीही पाचगणी येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारे पालघर जिल्हयातील आदिवासी विद्यार्थी अजूनही घरीच बसले आहेत.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार शाळा सुरू होवून महिना उलटला तरीही पाचगणी येथील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी अजूनही घरीच बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या वारंवार संपर्क करूनही शाळा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा तातडीने सुरु करण्यात यावी, यासाठी पालकांनी आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात धाव घेतली होती. पुणे जिल्ह्यातील पाचगणी स्कॉलर फाऊंडेशन या नामांकित शाळेसाठी आदिवासी विकास प्रकल्पाने निवड केली आहे. या नामांकित इंग्लिश मिडियम शाळेत जव्हार प्रकल्पातून इ. ८ ते १० वीपर्यंत एकूण १४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्या नामांकित इंग्लिश मिडियम शाळेच्या मनमानी कारभारामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत पाचगणी शाळेतील विद्यार्थी घरीच राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

पाचगणी स्कॉलर फाऊंडेशन शाळेत आदिवासी विद्यार्थी आणि बिगर आदिवासी विद्यार्थी यात शैक्षणिक भेदभाव केला जात असल्याची पालकांची तक्रार आहे. या शाळेत प्रकल्पाकडून पाठवलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, खानपान, वसतिगृह, यासह अन्य सोयीसुविधा, वेगळे राहण्याची व्यवस्थित सुविधा नाही. शौचालयाचीही दुरवस्था झाली आहे. अशा अनेक अडचणींचा सामना करत आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच शाळा सुरु होऊन महिला उलटला असतानाही आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले असल्याची पालकांची तक्रार आहे.

- Advertisement -

इ. ८ ते १० वीचे विद्यार्थी घरीच आहेत. म्हणून पालकांनी प्रकल्प अधिकर्‍यांची भेट घेवून शाळेच्या समस्या, विद्यार्थ्यांमध्ये केला जात असलेला शैक्षणिक दुजाभाव, अन्य अडचणी सांगितल्या. या शाळेच्या अनेक तक्रारी आहेत. म्हणूनच या पाचगणी स्कॉलर फाऊंडेशन शाळेची मान्यता रद्द करण्याचे अप्पर आयुक्तांना कळवण्यात आल्याचे प्रकल्प अधिकार्‍यांनी यावेळी पालकांना सांगितले. तसेच त्याशाळेत शिक्षण घेतल असलेल्या विद्यार्थ्यांना दुसर्‍या नामांकित शाळेत प्रवेश दिला जाईल, अशी ग्वाही प्रकल्प अधिकार्‍यांनी दिली.

आदिवासींची मुलांनी इंग्लिश शिकावे, आदिवासींचा मागासलेला शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी आदिवासी विकास विभागाने ठरवून दिलेल्या निर्णयानुसार नामांकित शाळांची निवड करून जव्हार आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पुणे, नाशिक, पनवेल, ठाणे या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले जाते. मात्र पाचगणी येथील स्कॉलर फाऊंडेशनने मनमानी नियम लागू करत आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवले आहे. शाळेच्या या अनागोंदी आणि मनमानी कारभारामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा प्रश्न तातडीने निकाली लागला नाही तर प्रकल्पाच्या कार्यालयातच शाळा भरवू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

हेही वाचा –

Reopen School In Mumbai : ‘ओमीक्राँन’मुळे मुंबईतील शाळा १५ डिसेंबरला उघडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -